श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर महाराष्ट्रात नसून ते आसाममध्ये; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा अजब दावा

0
316
Bhimashankar Temple Himanta Biswa Sarma
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर हे बारा ज्योर्तिलिंगांपैकी सहावे ज्योर्तिलींग आहे. भीमाशंकराचे मंदिर हे पुणे जिल्ह्यात आहे. मात्र, भीमाशंकराचे मंदिर महाराष्ट्रात नसून ते आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिसवा सरमा यांनी केला आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी दावा करत पर्यटन विभागामार्फत एक जाहिरातही प्रसिद्ध केली आहे.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी दावा केल्याने यावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान, यावर भीमाशंकर देवस्थानाचे मुख्य पुजारी मधुकरशास्त्री गवांदे यांनी पुरावेच सादर केले आहे. ‘आसाममध्ये भीमाशंकर असल्याचे प्रथमच ऐकायला मिळाले आहे. भीमा शंकरमध्ये असलेलं शिवलिंग हे पार्वती आणि शंकर असे आहे. असे शिवमंदिर इतरत्र कुढेही आढळत नाही. भीमाशंकर नावाने मंदिर असले म्हणजे ज्योर्तिलिंग होवू शकत नाही. देशातील इतर ज्योर्तिलिंगांबाबत देखील असेच वाद निर्माण केले गेले. यावर भाविकांनी विश्वास ठेवू नये.

‘भीमा नदीकाठी वसलेले ज्योर्तिलिंग हे भीमाशंकर म्हणून अनादीकालापासून प्रसिध्द आहे, आसाम सरकारच्या म्हणण्यावर कोणीही विश्वास ठेवू नका. येथील जोतिर्लिंगाचा शिवपुराण आणि शिवलीलामृतात उल्लेख आढळतो. शंकराचार्यांनी देखील सह्याद्री पर्वत रांगात भीमा नदीच्या काठी वसलेल्या भीमाशंकर ज्योर्तिलिंगावर काव्य रचले आहे, असे गवांदे यांनी म्हंटले आहे.

आसामच्या मुख्यमंत्र्यांचा दावा काय?

आसामच्या डाकिनी टेकडीच्या कुशित वसलेलं शंकराचं मंदिर हेच भीमाशंकर असल्याचा दावा सरमा यांच्याकडून करण्यात आला आहे. आसाम राज्यातील डाकिनी टेकडीच्या कुशित वसलेले पमोही गुवाहाटी येथील शिवलींग हे बारा ज्योर्तिलिंगांपैकी सहावे ज्योर्तीलींग श्री भीमाशंकर असून, याठिकाणी दि.18 रोजी होणाऱ्या महाशिवरात्रीनिमीत्त आयोजीत कार्यक्रमात भाविकांनी मोठया संख्येनं यावं असं आवाहन एका जाहिरातीच्या माध्यमातून आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिसवा सरमा यांनी केलं आहे.