16 आमदार अपात्रेप्रकरणी मोठी अपडेट!! विधानसभा अध्यक्षांनी घेतला ‘हा’ निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच 16 आमदार अपात्रता प्रकरणाची मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या 25 सप्टेंबर रोजी म्हणजेच सोमवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पुढील सुनावणी घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना एका आठवड्याच्या आत आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना झाल्याची बातमी समोर आली होती. या सर्व घडामोडीनंतर आज येत्या सोमवारी नार्वेकर या प्रकरणाची सुनावणी घेणार असल्याचे समोर आलेे आहे.

त्यामुळे आता सोमवारच्या सुनावणीत नक्की काय निकाल लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या 14 सप्टेंबरला शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रेबाबत राहुल नार्वेकर यांच्या समोर सुनावणी पार पडली होती. या सुनावणीमध्ये दोन्ही गटांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर नार्वेकर यांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी एक आठवड्याची मुदत  दिली होती. त्यानंतर 18 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी नार्वेकरांना चांगलेच सुनावले होते. तेव्हा आमदार अपात्रेच्याच्या सुनावणीला वेळ का लागत आहे? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला होता.

मुख्य म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकर यांना एक आठवड्याच्या आत या प्रकरणाची सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर नार्वेकर यांनी काल थेट दिल्ली गाठली होती. त्यामुळे प्रकरणासंबंधी तज्ञांशी चर्चा करण्यासाठी नार्वेकर दिलेला गेले असल्याचे सांगितले जात होते. अखेर आज आमदार अपात्र प्रकरणाची पुढील सुनावणीची तारीख समोर आली आहे. सोमवारी या सुनावणीसाठी दोन्ही गटाच्या आमदारांना उपस्थित रहावे लागणार आहे. यावेळी दोन्ही गटांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर या प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडून सुनावण्यात येईल. त्यामुळे सर्व 16 आमदारांसाठी 25 सप्टेंबर तारीख अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.