सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष असणाऱ्या किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान आणि सय्यद बंडा यांच्या कबरी भोवती असणारे सर्व अनाधिकृत बांधकाम आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने हजारो पोलिसांच्या फौज फाट्याच्या बंदोबस्तात अत्याधुनिक मशनरीने जमीनदोस्त केले. पहाटे 4 वाजल्यापासून पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पोलीस यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान आणि सय्यद बंडाच्या कबरीच्या अवतीभवती असणारे सर्व अनाधिकृत बांधकाम पाडण्यासाठी डेरे दाखल झाली होती. यावेळी प्रतापगडाच्या पायथ्याला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

संपूर्ण महाराष्ट्रात आज शिवप्रताप दिनी हाय अलर्ट घोषित करण्यात आला होता, तर सातारा जिल्ह्यात 144 कलम लागू करून जागोजागी नाकाबंदी देखील केली गेली आहे. यातच सकाळी सातच्या सुमारापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत 50 टक्के परिसरातील असणारे सर्व अनाधिकृत बांधकाम जमीन दोस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. मोठ-मोठाले पोकलॅंड, क्रेन जेसीबी, ट्रॅक्टर सर्व घटनास्थळी दाखल होऊन नियोजित आपापल्या दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, डीवायएसपी डॉ. शितल जानवे- खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि पुणे वरून आलेले सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत असणारे सर्व अनाधिकृत बांधकाम जमीनदोस्त करत होते.
यातच मूळ अफजलखान व सय्यद बंडाची असणाऱ्या कबरी वरील चबुतरा आणि त्याबरोबर असणारे दगडी बांधकाम मोठ मोठ्या पोकलेनच्या साह्याने पाडण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यात आधीच सर्वत्र शांतता कमिटीची बैठक घेऊन कोणताही कायदा सुव्यवस्था निर्माण होईल, असा अनुचित प्रकार उपस्थित होणार नाही. यासाठी खबरदारी घेण्यात आली होती. दोन दिवसापूर्वीच जिल्हा प्रशासनासह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी महसूल विभाग, वन विभागाचे अधिकाऱ्यांची मुंबई मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचनेवरून व मार्गदर्शनाखाली अफजलखान कबरीच्या अवतीभवती असणारे सर्व अनाधिकृत बांधकाम हटविण्यात येत आहे. सन 2017 ला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशावरून अतिक्रमण जमीनदोस्त करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यावरूनच ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे.