आटकेत तब्बल 30 वर्षांनी सत्तांतर; सर्वपक्षीय आघाडी परिवर्तन पॅनेलचा 8 जागांवर विजय

Atke Gram Panchayat elections
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील आटके येथे तब्बल तीस वर्षानंतर सत्तांतर झाले. पैलवान धनाजी पाटील यांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांनी ८ जागांवर विजय मिळवत लोकनियुक्त सरपंचपद काबीज केले. सरपंच पदाच्या उमेदवार रोहिणी नितीन पाटील यांनी प्रचंड मतांनी या ठिकाणी विजय मिळवला आहे. तर ग्रामविकास पॅनेल यांना ५ जागांवर समाधान मानावे लागले.

आटके येथे वार्ड क्रमांक १ मध्ये सर्व उमेदवार पैलवान धनाजी पाटील यांच्या गटाचे विजयी झाले तर वार्ड क्रमांक २ व ४ मध्ये परिवर्तन पॅनेलने बाजी मारली. अन्य ठिकाणी क्रॉस वोटिंग पाहायला मिळाले. वार्ड क्रमांक ३ मध्ये १ जागा परिवर्तन पॅनेलला तर १ जागा धनाजी पाटील यांच्या पॅनल मिळाली. वार्ड क्रमांक ५ मध्ये २ जागा परिवर्तन पॅनेलला तर १ जागा धनाजी पाटील यांच्या पॅनलला मिळाली.

विजयी सर्वपक्षीय परिवर्तन पॅनेल आघाडीचे उदयसिंह पाटील समर्थक कोयना बँकेच्या संचालक अजित पाटील, भैरवनाथ सोसायटीचे अरविंद पाटील कृष्णा कृषी परिषदेचे संचालक गजेंद्र पाटील कृष्णा बँकेचे संचालक प्रकाश पाटील कृष्णा कारखान्याचे माजी संचालक पोपटराव जाधव माजी सरपंच प्रकाश पाटील यांनी नेतृत्व केले.