जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगाव जिल्ह्यातील कासोदामध्ये चोरट्यांनी एटीएम (ATM) मशीन फोडून चोरी केल्याची घटना घडली आहे. या चोरटयांनी गॅस कटरने एटीएम (ATM) मशीन कटरने फोडले आणि त्यातील 9 लाखांची रोकड लंपास केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासोदा येथील बिर्ला चौक परिसरात हि एटीएम (ATM) चोरीची घटना घडली आहे.
बिर्ला चौक परिसरात युनियन बँकेचे एटीएम (ATM) मशीन आहे. चोरट्यांनी मध्यरात्री एटीएम मशीनमध्ये घुसले आणि गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडले. एटीएम मशीन फोडताना आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊ नये म्हणून चोरट्यांनी तोंडावर रुमाल बांधलेला होता. या चोरटयांनी गॅस कटरच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांत हे एटीएम मशीन फोडले आणि त्यातील 9 लाख 55 हजार रुपयांची रक्कम घेऊन चोरटे पसार झाले.
सकाळी जेव्हा स्थानिक दुकानादार आले असताना त्यांना एटीएममशीन फोडल्याचे आढळून आले. यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनास्थळाचा पंचनामा करून कासोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. कासोदा पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे या चोरट्यांचा शोध घेत आहेत. त्यासाठी त्यांनी शहरात नाकाबंदी केली आहे.
हे पण वाचा :
धक्कादायक ! दगडाने ठेचून चाकूने गळा कापून बाप-लेकाने केला तरुणाचा खून
शेन वॉर्नसारखा भन्नाट स्पिन करून श्रीलंकेच्या बॅटरला केले बोल्ड
मुंबई-गोवा महामार्गावर दोन डंपरची एकमेकांना धडक, चालकाचा जागीच मृत्यू
आता ‘या’ खाजगी बँकेने देखील आपल्या FD वर व्याजदरात केली वाढ !!!