पुण्यात तरुणीची महिला पोलिसाला मारहाण; आई अन् मुलगी भररस्त्यात करत होत्या अस काही की…

police matter
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील कर्वेनगर या ठिकाणी एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये कर्वेनगरमधील शाहु कॉलनी या ठिकाणी एक तरुणी आणि तिची आई दगड विटा आणि धारदार शस्त्राने गाड्यांची तोडफोड करत होते. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी पोलीस कंट्रोल रुमला फोन करून या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस ठाण्याचे बीट मार्शल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी ती तरुणी व तिच्या आईला चौकशीसाठी कर्वेनगरमधील पोलिसचौकीमध्ये आणले.

या तरुणीने व तिच्या आईने चौकी मधील दामिनी पथकातील महिला पोलिसावर अर्वाच्च, अश्लील भाषेत शिवीगाळ केली तसेच झटापट करत त्यांच्या खांद्यावरील म.पो.जाँईन्ट बेल्ट तोडला. यावेळी हि तरुणी महिला पोलिसावर हल्ला करताना “माझा गुन्हा काय असे अपरोधितपणे विचारत होती. ” त्याच वेळी शेजारी उभे असणारे पोलिस बघ्याची भूमिका घेताना दिसत होते. मात्र पोलिसांनी हि तरुणी नशेत होती कि नाही याबाबत सांगण्यास नकार दिला आहे. हि तरुणी एवढ्यावरच थांबली नाहीतर तिने एका पोलिस काँन्टेबलच्या वर्दीवर हल्ला चढवत शर्टाची बटण तोडली आहे. तसेच संबंधित ड्युटीवर असणारे पोलिस उपनिरीक्षकासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला.

हि तरुणी कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असताना संबंधित तरुणी आणि तिची आई चौकीतुन काही घडले नसल्यासारखे आरामात घरी निघुन गेल्या. मात्र या घटनेबाबत वारजे पोलिसांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. या तरुणीवर गुन्हा दाखल न करण्यासाठी वारजे मधील वरिष्ठ पोलिस निरीक्षक दबाव टाकत असल्याचे सूत्रांकडून समजत आहे. मृणाल किरण पाटील असे त्या तरुणीचे तर सजणा किरण पाटील असे तिच्या आईचे नाव आहे.