व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मोठा अनर्थ टळला ! राजधानी एक्स्प्रेस उलटवण्याचा कट फसला

वलसाड : वृत्तसंस्था – गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील अतुल रेल्वे स्थानकाच्या रेल्वे रुळावर सिमेंटचा खांब सापडल्यामुळे मोठा अपघात टळला आहे. काल सायंकाळी 7.10 वाजता राजधानी एक्सप्रेस या सिमेंटच्या खांबाला धडकली. मात्र सुदैवाने रेल्वेचा मोठा अपघात टळला आहे. हा सिमेंटचा खांब मुद्दाम रेल्वे रुळावर टाकल्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
वलसाडमधील अतुल रेल्वे स्थानकाजवळ एक मोठी दुर्घटना टळली आहे. यामध्ये अतुल रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर सिमेंटचा खांब टाकून ट्रेन उलटवण्याचा कट रचण्यात आला होता. शुक्रवारी सायंकाळी 7.10 वाजता राजधानी एक्सप्रेस धडकली मात्र सुदैवाने त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या प्रकरणाची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी, सुरत रेंजचे डीजी, वलसाड पोलीस, जीआरपी आणि आरपीएफ यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

या दुर्घटनेनंतर राजधानी एक्सप्रेससह सर्व गाड्या थांबवण्यात आल्या होत्या. अतुल रेल्वे स्थानकाच्या तारखुंटाजवळ शुक्रवारी सायंकाळी काही अज्ञातांनी हा सिमेंटचा खांब उखडून अहमदाबादकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर टाकला होता. यादरम्यान त्या ठिकाणाहून राजधानी एक्स्प्रेस गेली. हि एक्सप्रेस या खांबाला धडकल्याने हा सिमेंटचा खांब तुटला. यानंतर राजधानी एक्स्प्रेस ट्रेनचे पायलट मोहम्मद सिद्दीकी यांनी अतुल रेल्वे स्टेशनच्या स्टेशन मास्टरला या घटनेची माहिती दिली. यानंतर रेल्वे पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेऊन हा खांब रेल्वे रुळावरून बाजूला करण्यात आला.