हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल झाली असून पत्राचाळ प्रकरणी सकाळपासुन ईडीकडून त्यांची चौकशी सुरु आहे. संजय राऊतांच्या अटकेचीही शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांसह शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उध्दव ठाकरेंना काळजी…अटक झाली तर मुलाखत कोणाला देणार? आणि पवारांनाही काळजी…शिवसेनेत राहून राष्ट्रवादीची भांडी कोण घासणार? असा टोला त्यांनी लगावला.
अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हंटल, उध्दव ठाकरेंना काळजी…अटक झाली तर मुलाखत कोणाला देणार? आणि पवारांनाही काळजी…शिवसेनेत राहून राष्ट्रवादीची भांडी कोण घासणार? अशी खोचक टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. करेक्ट कार्यक्रम सुरू झालाय. आणि इथे शिवीगाळ करून उपयोग ही नाही…. ED वाले ट्विटर वाचत नाहीत आणि पुरेसे कागदोपत्री पुरावे असल्याशिवाय घरी येत नाहीत. घरी आले की सोबत घेऊनच जातात. घेऊन गेले की लवकर सोडत नाहीत. असा इशाराही त्यांनी संजय राऊतांना दिला.
उध्दव ठाकरेंना काळजी…
अटक झाली तर मुलाखत कोणाला देणार?
पवारांनाही काळजी…
शिवसेनेत राहून राष्ट्रवादीची
भांडी कोण घासणार?— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 31, 2022
दरम्यान, पत्राचाळ प्रकरणी चौकशी करण्यासाठी ईडीचे सुमारे १० अधिकारी संजय राऊतांच्या घरी गेलेलं आहेत. या आधीही पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय राऊतांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं. मागील आठवड्यात २ वेळा ईडीने त्यांना समन्स बजावले होते. मात्र संसदेचं अधिवेशन सुरु असल्याचे कारण देत संजय राऊतांनी चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. मात्र आज अचानक ईडीचं पथक थेट राऊत यांच्या घरी पोहोचल्याने राऊत यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. राऊतांच्या अटकेची देखील शक्यता आहे.