सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड दक्षिणमधून सात वेळा आमदार झालेले माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचे पुत्र व रयत कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील यांच्या शिवसेना प्रवेशबाबत भाजपा प्रदेश चिटणीस ना. डॉ. अतुल भोसले काय म्हणाले….राज्यात भाजपा-सेना युती ही कायम राहणार आहे. उदयसिंह पाटील यांनी शिवसेनेत येण्यापेक्षा भाजपामध्ये यावे. युतीच्या विचारात येणार्याचे स्वागतच आहे.
जर कराड दक्षिणमध्ये भाजपचे तिकीट उदयसिंह पाटील यांना मिळाले तर पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचे आम्ही काम करू, असेही त्यांनी जाहीर केले.
उदयसिंह पाटील यांच्या पक्ष प्रवेशेच्या चर्चेमुळे कराड दक्षिणमधील राजकीय वातावरण चांगलेच रंगू लागले आहे.
उदयसिंह पाटील यांच्या राजकीय प्रवेशानंतरच कराड दक्षिणमधील चित्र स्पष्ट होऊ शकते…. नेमके उदयसिंह पाटील कायम भूमिका असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.