हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या Twitter म्हणजेच सध्याच्या X मध्ये कंपनीने बरेच वेगवेगळे फीचर्स आणले आहेत. इलॉन मस्क यांनी ट्विटरची जबाबदारी स्वीकारल्यापासून ट्विटर नाव बदलण्यापासून अनेक बदल पाहायला मिळाले. आता ट्विटरमध्ये आणखी एक फीचर्स लाँच झालं आहे ज्यामुळे तुम्ही कोणालाही ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करू शकता. ट्विटरच्या या फीचर्स मुळे व्हाट्सअँप ला झटका बसण्याची शक्यता आहे.
काही महिन्यांपूर्वी ट्विटरने सांगितले होते की ते ऑडिओ व्हिडिओ कॉल फीचरवर काम करत आहे. हे फीचर आल्यानंतर तुम्ही WhatsApp, Instagram आणि Facebook सारखेच Twitter वरून सुद्धा ऑडिओ व्हिडिओ कॉल देखील करू शकता. आता हे फीचर्स लाँच झाल्यानंतर यूजर्सना याचा मोठा फायदा होऊ शकतो. आत्तापर्यंत हे फीचर युजर्सना हळू हळू दिले जात होते पण आता सर्व यूजर्सना मिळाले आहे. सध्या ट्विटरवर ऑडिओ व्हिडिओ कॉलचा पर्याय फक्त प्राइम सदस्यांसाठी आहे. मात्र प्रत्येकाला कॉल रिसिव्ह करण्याची सुविधा असेल.
X वर Audio- Video कॉल फीचर्स कस वापरायचं?
१) सर्वात आधी X च्या सेटिंग्ज पर्यायावर जा.
२) यामध्ये तुम्हाला Privacy and Safety या पर्यायावर जावे लागेल.
३) आता तुम्हाला येथे डायरेक्ट मेसेजचा पर्याय मिळेल.
४) तुम्हाला डायरेक्ट मेसेजवर ऑडिओ व्हिडिओ कॉलचा पर्याय मिळेल, तो इनेबल करा.
दरम्यान, ट्विटरवर गेल्या वर्षभरात अनेक मोठे बदल झाले आहेत यापूर्वी एलोन मस्क यांनी ट्विटर साठी सब्स्क्रिबशन प्लॅनही आणला होता. ज्यांनी पैसे देऊन हा प्लॅन घेतलाय त्यांच्याच अकाउंट समोर ब्लु टिक दिसतेय आणि याच यूजर्सना ट्विटरच्या जास्तीत जास्त फीचर्सचा लाभ होऊ शकतो.