औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबाद मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन पानांची सुसाईड नोट लिहून औरंगाबाद येथील नामांकित बिल्डरने आत्महत्या (suicide) केली आहे. अनिल माधवराव अग्रहारकर असे आत्म्हत्या (suicide) करणाऱ्या बिल्डरचे नाव आहे. अनिल अग्रहारकर यांना औरंगाबाद शहरातील एक नामांकित बांधकाम व्यवसाय म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या राहत्या घरातल्या जिम मध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली.आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी दोन पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी चार व्यावसायिकांनी कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे नमूद केले आहे.
या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिल अग्रहारकर यांचा मित्र विहार कॉलनीमध्ये बंगला आहे. तेथे ते पत्नी, मुलगा, मुलगी आणि सुनेसह राहतात. काल सकाळी बंगल्यातील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या जिम मध्ये त्यांनी गळफास (suicide) घेतला. 7.30 वाजले तरी ते खाली आले नाही म्हणून त्यांची पत्नी जीम मध्ये गेल्या तेव्हा त्यांना अनिल अग्रहारकर यांनी गळफास (suicide) घेतल्याचे दिसले. घटना पाहताच त्यांना फासावरून खाली उतरवण्यात आले. जवळच असलेल्या हेडगेवार हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासल्यानंतर मृत घोषित केले.
यानंतर पोलिसांनी संपूर्ण घराची झडती घेतली असता त्यांच्या बेडरूम मध्ये एक डायरी मिळाली. त्या डायरीमध्ये त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवल्याचे निदर्शनास आले. या डायरीमध्ये त्यांनी नमूद केले कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्यामुळे ते हे टोकाचे पाऊल (suicide) उचलत आहेत. बांधकाम व्यवसायातील अग्रगण्य संस्था कॉन्फडरेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (क्रीडाई) औरंगाबाद शाखेचे अनिल अग्रहारकर हे कोषाध्यक्ष होते. सध्या त्यांचा चौरंगी हॉटेलच्या जागेवर बहुमजली इमारतीचा प्रकल्प त्याचबरोबर साई टेकडी सह अनेक ठिकाणी त्यांच्या बांधकामाची साईट सुरू असल्याची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली आहे.
हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?