औरंगाबाद प्रतिनिधी । खासगी शिक्षण संस्था चालकाला ब्लॅकमेल करून खंडणी मागून ५ लाख रूपये स्वीकारताना राजकीय पुढाऱ्याला शहर पोलिसांनी रंगेहात पकडले. हा पुढारी समाजवादी पक्षाचा औरंगाबादचा प्रमुख महासचिव असल्याचं समजत आहे. अमितकुमार सिंग असं पुढाऱ्याच नाव असून या प्रकरणात सहभागी त्याच्या साथीदारांदेखील पोलिसांनी अटक केली गेली आहे. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सिंग याच्यावर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती सुद्धा समोर अली आहे.
दरम्यान, फिर्यादी सुनील पालवे यांच्या औरंगाबादमध्ये अकरा शाळा आहेत. समाजवादी पक्षाचा महासचिव म्हणून ओळख असणाऱ्या अमित कुमार सिंग आणि त्याच्या साथीदाराने फिर्यादी पालवे यांच्या शाळेची गुप्त आर्थिक माहिती काढल्याचं सांगत यांच्याकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र खंडणी देण्यास नकार देत पालवे यांनी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा नोंद केल्यानंतर देखील आरोपी हे पालवे यांना खंडणीसाठी तगादा लावत होते. शेवटी पालवे ५ लाख रुपये देण्यासाठी तयार झाले .
दरम्यान पालवे यांनी या संदर्भात पोलिसात फिर्याद दाखल केली. पालवे यांच्या फिर्यादीवर कारवाई करत आज शहरातील विद्यानगर भागात पोलिसांनी सापळा रचला.नियोजित ठिकाणी आरोपी सिंग आणि त्याचा साथीदार प्रशांत वाघरे हे दोन वेगवेगळ्याआलिशान गाडीतून तेथे आले होते. पालवे यांनी यावेळी त्यांच्या हाती ५ लाख रुपये देताच ते स्वीकारताना पोलिसांनी सिंग याला रंगेहात अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.