Tuesday, January 31, 2023

औरंगाबाद : गेल्या 20 दिवसात कोरोना बाधितांची संख्या 50 च्या आत

- Advertisement -

औरंगाबाद : कोरोना महामारीमूळे संपूर्ण राज्यभर थैमान घातले आहे. कोरोना हरवण्यासाठी शासनाने निर्बंध लावले आहे. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. या दुसऱ्या लाटेत एकाच दिवसात कोरोनाच्या 800 वर रुग्णांची भर पडत होती. आता ही रुग्णसंख्या 20 दिवसांवर गेली आहे.

कोरोना जेवढा वाढत आहे त्या पेक्षा दुप्पटीने रुग्ण बरे होत आहे. जिल्ह्यात 1 ते 20 जुलैदरम्यान 848 कोरोना रुग्णांची वाढ झाली होती, आणि त्याच कालावधीत 1 हजार 159 कोरोनामुक्त झाले होते. आणि आता 12 दिवस कोरोना रुग्णांची संख्या 50 च्या खाली असल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

त्याचबरोबर कोरोना बढितांच्या मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाल्याचे दिसत आहे. जुलै मध्ये 20 दिवसात 51 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. 9 जुलै रोजी 47, 10 जुलैला 38, 11 जुलै 33, 12 जुलै 24, 13 जुलै 30,14 जुलै 35,15 जुलै 48,16 जुलै 46,17 जुलै 41, 18 जुलै 31,19 जुलै 47,आणि 20 जुलै 37 एवढी कोरोना रुग्णांची संख्या होती.