औरंगाबाद – कोरोना महामारी पासून तब्बल 761 दिवसांनंतर औरंगाबादकरांची सुटका झाली आहे. काल जिल्ह्यात तीन कोरूना रुग्णांचे उपचार पूर्ण झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. त्यामुळे आज जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण शिल्लक राहिला नाही. नव्याने आढळून येणारे रुग्णही गेल्या सहा दिवसांपासून शुन्यच आहेत.
15 मार्च 2020 रोजी शहरात धोरणाने शिरकाव केला. त्यानंतर शहरात कोरोनाचा उद्रेक झाला. एका दिवसात तब्बल दोन हजारांच्या घरात रुग्णांची भर पडली. तर दिवसाकाठी जवळपास 40 रुग्ण उपचारादरम्यान प्राण गमावत होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्ण आणि मृत्यूचा हाहाकार पाहायला मिळाला.
मात्र जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व प्रशासनाने सर्व परिस्थितीवर यशस्वीपणे मात करत रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था केली. 2022 या नवीन वर्षात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली. मात्र अवघ्या महिन्याभरातच तिसरी लाट ओसरली, तर फेब्रुवारीपासून रुग्ण संख्येचा आलेखही घसरला.