गुणरत्न सदावर्तेंच्या सहकार्याला औरंगाबादेतून अटक 

  औरंगाबाद – शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावरील हल्ल्यानंतर पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतले. त्यानंतर आता सदावर्ते यांच्या एका सहकाऱ्याला औरंगाबादमधून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. एसटी आंदोलनात गुणरत्न सदावर्ते यांच्या सोबत असलेल्या एका व्यक्तीला औरंगाबादेतून अटक झाली आहे. एसटी कर्मचारी अजय गुजर असे … Read more

औरंगाबाद शहरातील प्रत्येक वॉर्डात हनुमान चालीसा पठण करणार; मनसेचा निर्धार 

औरंगाबाद – राज्यात सध्या भोंगे आणि हनुमान चालीसाची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान आज हनुमान जयंती आहे. औरंगाबाद शहरातील प्रत्येक वॉर्डात हनुमान चालीसा पठण करणार, तसेच जर हिंदुस्थानात हनुमान चालीसा म्हणायचं नाही तर कुठे म्हणायचं असा सवाल मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांची उपस्थित केला आहे. सध्या राज्यात भोंगे आणि हनुमान चालीसा यावरुन चांगलेच राजकारण तापले … Read more

761 दिवसांनंतर औरंगाबादकरांची कोरोनापासून सुटका 

Corona

  औरंगाबाद – कोरोना महामारी पासून तब्बल 761 दिवसांनंतर औरंगाबादकरांची सुटका झाली आहे. काल जिल्ह्यात तीन कोरूना रुग्णांचे उपचार पूर्ण झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. त्यामुळे आज जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण शिल्लक राहिला नाही. नव्याने आढळून येणारे रुग्णही गेल्या सहा दिवसांपासून शुन्यच आहेत. 15 मार्च 2020 रोजी शहरात धोरणाने शिरकाव केला. त्यानंतर शहरात कोरोनाचा उद्रेक … Read more

जालना-औरंगाबादहून नवीन वर्षात धावणार इलेक्ट्रिक इंजिन

railway

औरंगाबाद – मनमाड (अंकाई) ते रोटेगाव रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आता रोटेगाव ते औरंगाबाद दरम्यान 5 महिन्यांत म्हणजे सप्टेंबरपर्यंत विद्युतीकरण पूर्ण होईल. तर औरंगाबाद ते जालना दरम्यान फेब्रुवारी 2023 पर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे पुढील वर्षी जालन्याहून इलेक्ट्रिक इंजिन असलेली रेल्वे धावण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. केंद्रीय रेल्वे विद्युतीकरण … Read more

भाजप, राष्ट्रवादी मधील अनेक नेते माझ्या संपर्कात; काँग्रेस नेत्याचा गौपयस्फोट

BJP NCP Logo

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे राज्यातील महाविकास आघाडी मधील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी संयम पाळला पाहिजेल. स्थानिक पातळीवर आपसा मध्ये समनव्य आणि संयम असावा, आपल्या वर्तनाचा परिणाम महाविकास आघाडीच्या व्यवस्थेला धक्का लागणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे मत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केले. सांगली मध्ये कदम हे प्रसारमाध्यमाशी बोलत होते. एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्त्यानमध्येच … Read more

पुणे – बंगलूर महामार्गावर वाहतुक कोंडी; 30 कि.मी वाहनांच्या रांगा

सातारा | पुणे- बेंगलोर महामार्गावर कोरोना बंदी दोन वर्षानंतर हटल्यामुळे ग्रामीण भागात सध्या चैत्र महिन्यातील यात्रांचा हंगाम मोठ्या प्रमाणावर आहे. दख्खनचा राजा अशी ओळख असलेल्या जोतिबा देवाची यात्राही सध्या सुरु आहे. जोतिबा यात्रेचा मुख्य दिवस उद्या शनिवारी दि. 16 रोजी असल्याने पुणे-बंगलोर महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी आहे. त्यामुळे गेल्या 4 ते 5 तासापासून ट्राफिक जाम … Read more

तुमच्याकडे २४ तास, मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचा; शिवसेनेचे राणा यांना खुलं आव्हान

अमरावती । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थाना समोर हनुमान चालीसा वाचू असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिल्यानंतर यावर शिवसेना कडुन प्रतिक्रिया आली आहे. अमरावती शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडदे यांनी यावर प्रतिक्रिया देत आमदार रवी राणावर टीका करत रवी राणा यांना आव्हान दिले. मातोश्री बंगला शिवसैनिकांचे मंदिर आहे. ते काही भाजपा नेत्याच … Read more

माजी मनसैनिकाचं आव्हान! राज ठाकरेंनी स्वतः याव त्यांचा ताफा मी आडवेन (Video)

सोलापूर । राज ठाकरेंनी उपस्थित केलेला मस्जिदी वरील भोंग्यांचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंना त्यांच्याच एका माजी मनसैनिकाने आवाहन दिलं आहे. सोलापूर प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांना मस्जिदी वरील भोंगे काढण्यासाठी राज ठाकरेंनी स्वतः याव त्यांचा ताफा मी आडवेन असं म्हटल आहे. राज ठाकरे हे मुख्यमंत्री, प्रधानमंत्री नाहीयेत. त्यामुळं त्यांनी … Read more

फटाक्यांनी गच्च भरलेल्या चालत्या ट्रकवर पडली वीज; पुणे – सोलापूर मार्गावर त्यानंतर झालं असं काही…(Video)

सोलापूर । फटाक्याच्या ट्रकवर आज पहाटे भर पावसात वीज कोसळून मोठा अपघात झाला. त्यामुळे फटाक्यांच्या स्फोटाने ट्रक भस्मसात झाला. ही घटना सोलापूर पुणे हायवेवर वरवडे टोल नाका परिसरात आज पहाटे घडली. फटाक्याने भरलेला ट्रक पुणे कडून सोलापूर कडे जात असताना चालत्या ट्रकवर वीज पडली. यामुळे ट्रक मधील फटाके पेटले आणि एका मागोमाग एक फटाक्यांचे स्फोट … Read more

उन्हामुळे सकाळच्या सत्रात भरणार शाळा 

औरंगाबाद – उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात भरण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी घेतला आहे. एका सत्रात भरणाऱ्या शाळा सकाळी 7: 30 ते 11:30 पर्यंत, तर दोन्ही सत्रात भरणाऱ्या शाळेच्या वेळेत बदल करण्यात आलेला नाही. शिक्षण हक्क कायद्यानुसार नियोजित अध्यापनाच्या तासिका आज बदल होणार नाही. तसेच … Read more