Wednesday, June 7, 2023

उन्हामुळे सकाळच्या सत्रात भरणार शाळा 

औरंगाबाद – उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात भरण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी घेतला आहे. एका सत्रात भरणाऱ्या शाळा सकाळी 7: 30 ते 11:30 पर्यंत, तर दोन्ही सत्रात भरणाऱ्या शाळेच्या वेळेत बदल करण्यात आलेला नाही.

शिक्षण हक्क कायद्यानुसार नियोजित अध्यापनाच्या तासिका आज बदल होणार नाही. तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्याची खात्री करावी, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांनी सांगितले.

पाचवी ते नववीच्या परिक्षांचे वेळापत्रक औरंगाबाद जिल्हा शिक्षण मंडळाकडून निश्चित करण्यात आले आहे. 18 ते 26 एप्रिल नववी तर 18 ते 23 एप्रिल दरम्यान पाचवी ते आठवी ची परीक्षा होणार आहे. तालुका स्तरावरून शाळांना वेळापत्रक वाटप करण्यात आले शारीरीक शिक्षण, चित्रकला व तोंडी परीक्षा शाळा स्तरावर घेण्यात याव्यात, अशा सूचना कार्याध्यक्ष एन.एम. नक्षबंदी यांनी दिल्या.