Sunday, May 28, 2023

माजी मनसैनिकाचं आव्हान! राज ठाकरेंनी स्वतः याव त्यांचा ताफा मी आडवेन (Video)

सोलापूर । राज ठाकरेंनी उपस्थित केलेला मस्जिदी वरील भोंग्यांचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंना त्यांच्याच एका माजी मनसैनिकाने आवाहन दिलं आहे. सोलापूर प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांना मस्जिदी वरील भोंगे काढण्यासाठी राज ठाकरेंनी स्वतः याव त्यांचा ताफा मी आडवेन असं म्हटल आहे.

राज ठाकरे हे मुख्यमंत्री, प्रधानमंत्री नाहीयेत. त्यामुळं त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश देण्यापेक्षा स्वतः मैदानात उतरावं. अजित कुलकर्णी यांनी सोलापूर मनसेच 3 वर्ष शहरउपाध्यक्ष पद भूषवलं आहे. विशेष म्हणजे ज्यावेळेस मनसेने टोल प्रश्न हाती घेतला होता त्यावेळी टोल फोडल्यानंतर अजित कुलकर्णीचा राज ठाकरेंनी मुंबईला बोलावून सत्कार केला होता.

दरम्यान, राज ठाकरे हे कांही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी नंतर काँग्रेस आणि आता भाजपचे बोलके पोपट म्हणून काम करत आहेत. अशी ही टीका अजित कुलकर्णीने केलीय. आज प्रहार संघटनेकडून मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीच आयोजन करण्यात आले होते,त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.