गोकुळच संचालक व्हायचं मग काढून दाखवा दहा लिटर दूध : राजू शेट्टींचं खुलं चॅलेंज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मात्तबर नेत्यांची धावपळ सुरु झालीय. कुणी प्रत्यक्ष तर कुणी छुप्या पद्धतीनं आपली रणनिती आखत आहेत. गोकुळच्या निवडणुकीत आकर्षणाच्या ठिकाणी दोनच नेते आहेत. तर गोकुळमधील विरोधक एक एक नेता विरोधी पॅनलमध्ये म्हणजे राजर्षी शाहू विकास आघाडीत घेत आहेत. तर सत्ताधारी प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन आपली सत्ता भक्कम … Read more

पंढरपूरच्या शिवसेना नेत्या शैला गोडसे यांची हकालपट्टी

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार भालके यांच्या विरोधात बंडखोरी केलेल्या शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक शैला गोडसे यांच्यावर शिवसेना पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची डोकेदुखी सातत्याने वाढत चालली असून बंडखोरी केलेल्या शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक शैला गोडसे यांनी उमेदवारी मागे घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शिवसेनेकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली … Read more

भाजप नेत्यांनी प्रचारात वापरली काँग्रेस नेत्याच्या सुनेची डान्स क्लीप; मोदी शहांवर तोंडघशी पडण्याची वेळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : तामिळनाडूत भाजप नेत्यांकडून प्रचारात अनेक नवीन आयडियाची कल्पना वापरली जात आहे. मात्र, ती वापरताना त्यांची काहीवेळा फसगतही होत आहे. अशीच काहीशी फसगत भाजप नेत्यांची तामिळनाडूत झाली आहे.  प्रचारादरम्यान भाजप नेत्यांनी चक्क काँग्रेस नेत्याच्या सुनेची डान्स क्लीपच वापरली आहे. तामिळनाडूत भाजपच्या नेत्यांनी केलेल्या या प्रतापामुळे भाजपचे नेते, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व … Read more

पवार साहेब रोजच्या आवडत्या कामात पून्हा रुजू ; सुप्रिया सुळेंनी ट्विट केला पवारांचा हॉस्पिटलमधील फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांना पोटदुखीच्या त्रासामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांना पित्ताशयाचा त्रास होत असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. सध्या पवार साहेबांची प्रकृती स्थिर असून ते त्यांचं रोजचं आवडतं काम कि न्युज पेपरच ते करत आहेत, अशी माहिती त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे … Read more

‘या’ प्रकरणी जितेंद्र आव्हाड अडचणीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्राचे गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड  यांच्या  अडचणी वाढल्या आहेत. कारण सिव्हील इंजिनिअर अनंत करमुसे यांच्या मारहाण प्रकरणात न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्धच्या त्यांच्या मोबाईल फोनचा संपर्क तपशील नोंद (सीडीआर) काढण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. अंबानी स्फोटक प्रकरण आणि पोलीस दलातील अधिकाऱ्यांसह मंत्र्यांवर झालेल्या आरोपांमुळे अगोदरच घायाकुतीला … Read more

शरद पवारांच्या भेटीबाबत मोदी व शहा हिशोब चुकता करणार : चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एखाद्याच्या भेटीनंतर त्याच्यावर होणाऱ्या अन्यायावर पांघरून घालणारे नेते नाहीत; तर एकमेकांचा हिशोब चुकता करण हा त्यांचा इतिहास आहे, असं मत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीबद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल. … Read more

शरद पवारांच्या पोटात आत्ताच का दुखायला लागले? भाजप नेत्याचे वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पोटदुखी आणि पित्ताशयाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. अनेकांनी ट्विटरवरुन शरद पवार यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. पवार यांची प्रकृती बिघडल्यानंतर एकीकडे भाजपचे प्रमुख नेते फोन करुन त्यांची विचारपूस करत असताना दिल्ली भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीन … Read more

आला रे आला आता अभिजित बिचुकले आला; बिचुकलेची पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत एन्ट्री !

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : एकेकाळी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही खुलेआम आव्हान देण्याचं धाडस करणारा व शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष व महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढविणार्‍या अभिचित बिचकुले यांनी पंढरपूर विधानसभा निवडणूकीसाठी रणशिंग फुंकले आहे. सातारच्या अभिजित बिचुकले यांनी आता पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. अभिजित … Read more

संजय राऊत मोठे नेते, पण यूपीएचं अध्यक्षपद सोनिया गांधींकडेच राहील’ : बाळासाहेब थोरात

balasaheb thorat 2

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : ‘संजय राऊत हे मोठे नेते आहेत. त्यांचे महाविकासआघाडीचं सरकार स्थापन करण्यात महत्वाचे योगदान आहे; पण यूपीएचं अध्यक्षपद हे सोनिया गांधीं यांच्याकडेच राहील असं विधान काँग्रेस नेते आणि राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेव थोरात यांनी केले आहे. यूपीएचा अध्यक्ष बदलावा अशी परिस्थिती सध्या नाही असं म्हणत थोरात यांनी सोनिया गांधीच युपीएच्या अध्यक्षा राहतील हे … Read more

बकबक करणाऱ्या संजय राऊतांची आधी चौकशी करा; काँग्रेस नेत्याची एनआयएकडे मागणी

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरने मृत्यू प्रकरण यामध्ये अनेक धक्कादायक पुरावे दररोज समोर येत आहे. रोज नवनवीन गोष्टींमुळं हे प्रकरण चर्चेत असते. एनआयएच्या ताब्यात असलेल्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin VazeCongress) यांच्या मुद्यावरुन काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी ट्विट करून शिवसेनेवर … Read more