सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे |
खानापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल लोखंडे यांनीच मंगळवारी विट्यात ओमायक्रॉनचे रूग्ण सापडल्याची अफवा प्रसिध्दि माध्यमांमार्फत पसरवल्याने खानापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. खानापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल लोखंडे यांनी मंगळवारी विट्यात कोरोनाचे रुग्ण सापडले असल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली. याबाबत काही पत्रकारांनी त्यांना हे रुग्ण कोणत्या व्हेरिएंटचे असल्याचे विचारले असता त्यांनी थेट ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले असल्याची माहिती दिली.
यानंतर अनेक लोकांसह पत्रकारांचे फोन डॉ. अनिल लोखंडे यांना गेले. त्यानंतर मात्र या महाशयांनी यु टर्न घेत लोकांना सतर्क होण्यासाठी खोटी प्रसिद्धी होवू दे असे जाहिररित्या सांगितले. डॉ. अनिल लोखंडेच्या या प्रकारानंतर विट्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ माजली असून अनेकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.
पत्रकारांनाच ओमायक्रॉनबाबत खोटी माहिती देवून लोकांमध्ये दहशत पसरविण्याचे काम केले आहे. तरी या अधिकार्यावर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्यांतून होत आहे.