‘दोन वर्ष जनसेवेची, महाविकास आघाडीची’ मोहिमे अंतर्गत परभणी जिल्ह्यात लोककलेच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जागर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी : हॅलो महाराष्ट्र – महाविकास आघाडी सरकारला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाल्याने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, परभणी यांच्यामार्फत ‘दोन वर्ष जनसेवेची महाविकास आघाडीची’ या मोहिमेअंतर्गत विविध कल्याणकारी योजनांची लोककलेच्या माध्यमातून जनजागृती मोहिमेची सुरुवात 10 मार्च पासून झाली आहे.

या अनुषंगाने तुळजाभवानी कलामंडळ संचलित परभणी भुषण कै.राधाकिशन कदम केंद्र लोककला पथकाने आज पाथरी तालूक्यातील वाघाळा आणि मुदगल येथे ‘दोन वर्ष जनसेवेची, महाविकास आघाडीची’ मोहिमे अंतर्गत शासकीय योजनांचा जागर केला. यावेळी तुळजाभवानी कलामंडळ संचलित परभणी भुषण कै. राधाकिशन कदम केंद्र लोककला पथकाने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी‍ कर्ज मुक्त योजना, अतिवृष्टीमधील पिडीतांना मदत, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाला जोडणारा 94 कि.मी. द्रूतगतीमार्गामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकास, महामार्गाचा विकास, तिर्थक्षेत्रांचा विकास, पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर भाजीपाला रोपवाटीका योजना, आदर्श शाळा विकसीत करणे, मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती, अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांसाठीच्या योजना, शिवभोजन योजना, कोरोना लसीकरण, कोवीड काळात विमा संरक्षण, तांडा वस्ती सुधारणा, आजी माजी सैनिकांना सवलत, महात्मा फुले जन आरोग्य योजना, रस्ते अपघात योजना, शबरी आदिवासी घरकुल योजना, बालविवाहांना प्रतिबंध महिलां सक्षमीकरण धोरण, रमाई आवास योजना, स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार योजना आदीची माहिती यावेळी संस्थेने गोंधळ, पोवाडा, व नाट्यस्वरुपात सादरीकरण केले.

महाविकास आघाडी सरकारने मागील दोन वर्षात जनसामान्याना केंद्रबिंदू ठेवून अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या आणि निर्णय घेतले आहेत. सरकारच्या या योजना व निर्णय जनतेपर्यंत पोहचविण्याचे लोककलापथक प्रभावी माध्यम असून याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय, परभणी यांनी केले आहे.

Leave a Comment