हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Axis Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत चार वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता मुंबईस्थित खाजगी क्षेत्रातील Axis Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे.
5 नोव्हेंबर 2022 पासून नवीन दर लागू
Axis Bank च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, हे नवीन दर 5 नोव्हेंबर 2022 पासून लागू होणार आहेत. बँकेने 46 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वरील व्याजदरात 115 bps पर्यंत वाढ केली आहे. Axis Bank 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर आता सर्वसामान्यांना 3.50% ते 6.50% तर ज्येष्ठ नागरिकांना 3.50% ते 7.25% पर्यंत व्याज देत आहे. तसेच 3 ते 10 वर्षांच्या FD वर आता ज्येष्ठ नागरिकांना 7.25% आणि सर्वसामान्यांना 6.50% व्याजदर मिळेल.
Axis Bank च्या एफडीचे नवीन दर
7 दिवस ते 45 दिवसांच्या FD वर 3.50% व्याजदर मिळत राहतील, मात्र 46 दिवस ते 60 दिवसांच्या FD वरील बँकेने व्याजदर 3.50% वरून वाढवून 4% केला आहे. तसेच 61 दिवस ते 3 महिन्यांच्या FD वर 4.50%, 3 महिने ते 6 महिन्यांच्या FD वर 4.50% व्याजदर दिला जाईल. एक्सिस बँकेने 6 महिने ते 9 महिन्यांच्या FD वरील व्याजदर 5.50% आणि 9 महिने ते 1 वर्षाच्या FD वर 5.75% पर्यंत वाढवले आहेत.
अनेक बँकांनी FD चे दर वाढवले आहेत
अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर
अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.RBL Bank
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.axisbank.com/interest-rate-on-deposits
हे पण वाचा :
EPFO च्या EDLI स्कीमअंतर्गत अशा प्रकारे मिळवा 7 लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्स
Multibagger Stock : ‘या’ केमिकल स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला साडेतीन पट रिटर्न !!!
FD Rates : ‘या’ बँका FD वर देत आहेत जास्त रिटर्न, व्याज दर तपासा
आता फक्त एका कॉलमध्ये घरबसल्या अशा प्रकारे अपडेट करा Aadhaar Card !!!
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 100 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे स्टेट्स तपासा