Axis Bank देखील FD वर देणार जास्त व्याज, जाणून घ्या नवीन व्याजदर

Axis Bank
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Axis Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत चार वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता Axis Bank ने आपल्या बल्क फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर वाढवले ​​आहेत. बँकेने 5 कोटी रुपयांपासून ते 10 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.

Axis Bank shares slip 3% as govt to sell 1.55% stake via OFS | Mint

5 डिसेंबर 2022 पासून नवीन दर लागू

Axis Bank च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, हे नवीन दर 5 डिसेंबर 2022 पासून लागू होणार आहेत. या बदला नंतर आता बँकेकडून 7 दिवस ते 10 वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 4.65 ते 6.30 टक्के व्याज दिले जाईल.

आता अ‍ॅक्सिस बँक 5 कोटी रुपयांपासून ते 10 कोटी रुपयांपेक्षा कमी 7 दिवस ते 14 दिवसांच्या FD वर 4.65% व्याज देईल. 15 दिवस ते 45 दिवसांच्या FD वर 5% व्याज दिले जाईल. 46 दिवस ते 6 महिन्यांच्या FD वर वार्षिक 6.00% दराने व्याज मिळेल. बँक आता 6 महिने ते 9 महिन्यांच्या FD वर 6.35 टक्के व्याज देईल.

Government gets ₹3,839 cr from selling shares in Axis Bank - The Hindu BusinessLine

Axis Bank च्या एफडीचे नवीन दर

Axis Bank च्या ग्राहकांना 9 महिने ते 1 वर्षाच्या FD वर 6.40 टक्के आणि 1 वर्ष ते 13 महिन्यांच्या FD वर 7.00 टक्के दराने व्याज मिळेल. बँक आता 13 महिने ते 3 वर्षांच्या FD वर वार्षिक 6.80 टक्के दराने व्याज देईल. ग्राहकांना 3 ते 10 वर्षांच्या FD वर 6.30 टक्के व्याज मिळेल.

नॉन-कॉलेबल एफडीवरील व्याजदरही वाढले

अ‍ॅक्सिस बँकेने नॉन-कॉलेबल एफडीवरील व्याजदरातही सुधारणा केली आहे. इथे हे लक्षात घ्या कि, नॉन-कॉलेबल एफडी म्हणजे अशा एफडी, ज्या मॅच्युरिटीपूर्वी मोडता येत नाहीत. 2 कोटी रुपयांवरून 5 कोटी रुपयांपेक्षा कमी 30 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर आता 5.00 टक्के दराने व्याज दिले जाईल. 46 दिवस ते 3 महिन्यांच्या FD वर 6.00% व्याज आणि 3 महिने ते 6 महिन्यांच्या FD वर 6.30% व्याज मिळेल. आता ग्राहकांना 6 महिने ते 9 महिन्यांच्या FD वर 6.55 टक्के दराने व्याज मिळेल.

Axis Bank ने 9 महिने ते 1 वर्षाच्या FD वर 6.80 टक्के व्याजदर जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे 1 वर्ष ते 1 वर्ष 5 दिवसांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7.20 टक्के, 1 वर्ष 5 दिवस ते 3 वर्षाच्या FD वर 7 टक्के आणि 3 वर्ष ते 10 वर्षाच्या FD वर 6.80 टक्के मिळेल.

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

अनेक बँकांनी FD चे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर

अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://www.axisbank.com/interest-rate-on-deposits

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
वाईच्या ससाणेकडून माझी 20 लाखांची फसवणूक : अभिनेते सयाजी शिंदे