आयुष्मान भारत योजनेत मृत घोषित व्यक्तींवर उपचार सुरू; CAG कडून घोटाळा उघडकीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील नागरिकांना उपचारादरम्यान सुविधा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आयुष्मान भारत योजनेत घोटाळा झाल्याचे उघडकिस आले आहे. याबाबत कॅगकडून (CAG)  मोठा खुलासा करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत असे रुग्ण लाभ घेत आहेत ज्यांना मृत घोषित करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर, या योजनेतील तब्बल ९ लाख लाभार्थ्यांचे एकाच नंबरवरून रजिस्ट्रेशन करण्यात आले आहेत. त्यामुळे आयुष्मान भारत योजनेचा लाभ योग्यरीत्या नागरिकांना घेण्यास अडचण निर्माण झाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आयुष्मान भारत योजनेत असे लोक लाभ घेत आहेत ज्यांच्या नावापुढे मृत असे घोषित करण्यात आले आहे. तसेच आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या तब्बल ८८,७६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर, जवळपास 3,903 प्रकरणांमध्ये रुग्णांची रक्कम रुग्णालयांना अदा करण्यात आली आहे. यातील 3,446 रूग्णांची रक्कम 6.97 कोटी इतकी होती. जी उपचारादरम्यान रुग्णालयांना देण्यात आली आहे.

मुख्य म्हणजे, या योजनेअंतर्गत देशातील पाच राज्यांमधून मृत व्यक्तींवर उपचाराचा दावा केल्याची प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये छत्तीसगड, हरियाणा, झारखंड, केरळ , मध्य प्रदेश अशा राज्यांचा समावेश आहे. याप्रकरणी करण्यात आलेल्या तपासात असे आढळून आले आहे की, या योजनेच्या एकाच रुग्णाला एकाच वेळी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर सरकारकडून याबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, याबाबत अहवाल देखील सादर करण्यास सांगितला आहे.

आयुष्यमान भारत योजना

ही योजना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार गरीब आणि गरजू कुटूंबांना आरोग्य विमा उपलब्ध करून देते. या योजनेचा लाभ देशातील १० कोटीहून अधिक कुटुंबांना लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत रुग्णाला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देण्यात येतो. मात्र आता या योजनेत घोटाळा झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे.