हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. यावरून अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी निशाणा साधला आहे. राणेंना टोला लगावलाय. अकोल्यामध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी राणेंवर निशाणा साधला. “आपण ज्या प्रकारे पाहिले कि रेड्याने ज्ञानेश्वरी ओकली, अशाच प्रकारे नारायण राणेंनी सत्य ओकले आहे. मी मुख्यमंत्र्यांची सर करु शकत नाही असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही करुच नाही शकत,” असा टोला बच्चू कडूंनी लागवला आहे. .
मंत्री बच्चू कडू यांनी आज अकोला येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काल नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यांनी म्हंटले कि माझ्या कामाची बरोबरी उद्धव ठाकरे करूच शकत नाहीत. खरच आहे. उद्धवजी हे प्रमाणिक नेतृत्व आहे. अतिशय सात्विक मुख्यमंत्री आपल्याला लाभले आहेत. त्यामुळे नारायण राणेंची सर मुख्यमंत्री कशी करणार? त्यांची सर हे करुच शकणार नाही. त्यामुळे राणेंचे म्हणणे अगदी बरोबर आहे. त्यांनी हे सत्य ओकले आहे. रेड्याने जशी मुखातून ज्ञानेश्वरी ओकली, तसे नारायण राणेंनी सत्य ओकले आहे,” असा टोला बच्चू कडूंनी लागवला आहे.
नारायण राणे काय म्हणाले?
मुंबईतील पत्रकार परिषदेत मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. यावेळी राणे म्हणाले की, उद्धवजी अजून 10 वर्षे जरी मुख्यमंत्री असलात तरी नारायण राणेंनी आठ महिन्यात केलेल्या कामाची बरोबरी होऊ शकणार नाही. चेष्टा, विनोद करणे सोपे आहे. हे शिव्या संपर्क भाषण आहे, असे राणे यांनी म्हंटले होते.