हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रहार संघटनेचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. मी आमदार होणार की नाही? याची मला पर्वा नाही. मात्र शेतकऱ्यांची पर्वा असणारा आपला पक्ष आहे. आजकाल तर हिजडेही आमदार होतात असं म्हणत बच्चू कडू यांचा तोल सुटला. यानंतर आपली चूक लक्ष्यात येताच बच्चू कडू यांनी माफीही मागितली.
जळगाव जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेतकरी संवाद मेळाव्यात भाषण करताना बच्चू कडून यांनी हे विधान केलं. ज्याच्या बोलण्यात दम नसतो, ज्याच्या ओठावर मिशी नसते, चालतो तेव्हा बाई आहे की माणूस ते पण कळत नाही, असे लोकही आमदार होतात. हिजडे सुद्धा आमदार होतात असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं. त्यानंतर आपली चूक त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच सारवासारव केली. आंडू-पांडू लोक आमदार होतात असं मला म्हणायचं होतं मी चुकीचा शब्द बोलून गेलो त्याबद्दल माफी मागतो असं म्हणत त्यांनी माफी मागितली.
दरम्यान, जळगावातील सावदा इथे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत एक रॅली पार पडली होती. त्या रॅलीत एका शाळेतील मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेवरून बच्चू कडू यांनी कडक शब्दात हल्लाबोल केला आहे. कॉलेज आणि शाळांमधील मुलांचा वापर पक्षाच्या कामासाठी होता कामा नये. एखादी संस्था असं करत असेल तर अशा संस्था बंद केल्या पाहिजेत, अशा पद्धतीचा प्रकार प्रहार जनशक्ती खपवून घेणार नाही, असं बच्चू कडू यांनी म्हंटल.