कलेक्टरच्या ड्रायव्हरला 40 हजार अन् शंभर शेतकर्‍यांना घेऊन जाणार्‍या ST च्या ड्रायव्हरला 12 हजार पगार हे चुकिचं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली : शिक्षण विषयी कायद्यात बदल करन गरजेचं आहे, शिक्षण कायदा कुचकामी स्वरूपाचा आहे. कायदा पालकांच्या बाजूचा नसून तो संस्थाचालकांच्या बाजूचा आहे. शिक्षण कायद्यात बदल करण्याबाबत आम्ही पाठपुरावा करत आहोत, अशी माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. दरम्यान राज्यमंत्री बच्चू कडू यांचे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन असल्याचं सांगितलं असून, प्रसंगी प्रहार ही एसटी कर्मचारयांच्या बाजूने उतरेल असा इशारा ही राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मधील कृषी प्रदर्शनच्या उदघाटना नंतर बच्चू कडू बोलत होते. यावेळी बोलताना कलेक्टरच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणुन काम कर्मचार्‍याला 40 हजार पगार अन् शंभर शेतकर्‍यांना घेऊन जाणार्‍या ST च्या ड्रायव्हरला 12 हजार पगार मिळत असेल तर हे चुकिचं आहे असं कडू म्हणालेत.

फक्त केंद्राने कृषी कायदे रद्द करून चालणार नाही, तर कृषी विषयीक धोरण बदलणे गरजेचे : शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. धोरण हे पेनने लिहल जात, बेकार धोरनामुळे मात्र शेतकऱ्यांचं रक्त काढलं जात, अस सांगून राज्यमंत्री बच्चू कडू पुढे म्हणाले, शेतकरी म्हणून मतदान होणे गरजेचे, शेतकऱ्यांच्या अक्रोशाच मतदानात रूपांतर होणे गरजेचे आहे, त्या शिवाय व्यवस्था बदलता येणार नाही. शेतकऱ्यांना 50 टक्के वीज सवलत मिळावी यासाठी पाठवपूरवा केला जाईल.

Leave a Comment