मुंबईतील शाळा 15 डिसेंबर पासून सुरू; महापालिकेचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील प्राथमिक शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असला तरी मुंबईत मात्र, 15 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू होणार आहेत. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन नव्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे ( Omicron) पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शिक्षण आयुक्तांनी शाळा सुरु करण्याबाबत मनपा आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर मुंबई मनपाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता शाळा पंधरा डिसेंबरपासून सुरु होणार आहेत.

गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासदंर्भात माहिती दिली होती. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागानं सोमवारी शाळा सुरु करण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे शाळा 1 डिसेंबरपासून सुरु होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.  मात्र, मुंबई महापालिकेनं शाळा सुरु करण्यासाठी 15 डिसेंबरही तारिख निश्चित केली आहे.

You might also like