बच्चू कडूंचे स्टिंग ऑपरेशन; वेषांतर करून कंटेनमेंट झोनमध्ये शिरण्याचा केला प्रयत्न मात्र…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अकोला । राज्यात कोरोना विषाणूने चांगलेच थैमान घातले आहे. पंतप्रधान मोदी यांनीही १७ मे नंतर लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याचे सूचित केले आहे. राज्य सरकार देखील लॉकडाऊन १७ मे नंतर वाढवण्याच्या विचारात आहे. पोलीस प्रशासन कोरोनाच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहे. यापार्श्वभूमीवर राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी पोलिसांचेच स्टिंग ऑपरेशन केले आहे.

बच्चू कडू यांनी बैदपुरा भागातील कंटेनमेंट झोनमध्ये वेषांतर करून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. फाटे चौक येथे बच्चू कडू यांनी आपला चेहरा पोलिसांना दिसू नये यासाठी कापड गुंडाळलं होतं. दुचाकीवर मागच्या सीटवर ते बसले होते. पोलिसांनी ओळखू नये यासाठी त्यांनी स्वत:देखील पोलिसांशी बोलणं टाळलं. त्यांच्यासोबत असणारी व्यक्ती आपल्याला आत सोडा म्हणून पोलिसांकडे विनंती करत होती. आतमध्ये आमचे पाहुणे राहतात..लगेच जाऊन येतो असे सांगितले तरी सदर पोलीस अधिकाऱ्याने कडू यांना आतमध्ये जाऊ दिले नाही. याउलट कंटेनमेंट झोनमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असल्याने सुनावलं. यामुळे राज्यमंत्री कडू यांनी घेतलेल्या परीक्षेमध्ये पोलीस पास झाले आहेत. यावेळी बच्चू कडू यांनी पोलिसांना कंटेनमेंट झोनमध्ये अतिशय कठोरपणे नियमांची अमजबजावणी केली जावी अशा सूचना दिल्या आहेत.

https://twitter.com/bachhukadu0796/status/1260831646007332864

दरम्यान बच्चू कडू यांनी आज अकोला जिल्ह्यातील कोरोना बाधित भागांना भेटी दिल्या. तसेच त्यांनी यावेळी कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या अनेक रुग्णालयांना भेट देऊन पाहणी केली. अकोला येथून सकाळी तेलंगणाची सुटलेल्या एसटी बस ला कडू यांनी हिरवा झेंडा दाखवून अडकलेल्या कामगारांना निरोप दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”