वाळवा : लाल्या उर्फ विशाल भोसलेला अटक; मित्राचा डोक्यात दगड घालून केला होता खून

0
61
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

वाळवा तालुक्यातील बहे येथे पूर्ववैमनस्यातून सचिन तानाजीराव पाटील याच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खून करण्यात आला. सचिनच्या डोक्यात दगडाचा वर्मी घाव बसल्याने उपचार सुरू असताना दुपारच्या सुमारास सचिनचा मृत्यू झाला. याप्रकरणी लाल्या उर्फ विशाल विजय भोसले याला पोलिसांनी अटक केली आहे.

बहे येथील सचिन पाटील व विशाल भोसले हे दोघे जुने मित्र आहेत. दीड महिन्यापूर्वी सचिन व विशाल या दोघांमध्ये वाद झाला होता. सुनिल अनुसे, महेश घबक, सचिन पाटील, विशाल भोसले हे बहे येथील लालबहादुर शास्त्री विद्यालयाच्या व्हरांडयात बसले होते. त्यावेळी विशाल भोसलेने सचिनला माझ्या पैशांचा व्यवहार मिटव नाहीतर तुला बघून घेईन अशी धमकी दिली. व्यवहाराप्रमाणे पैसे देतो परंतू जास्त मागितले तर देणार नाही असे सचिनने उत्तर दिले. त्यावेळी विशाल भोसले बघतो काय करायचे असे म्हणून निघून गेला.

त्यांनतर दुपारी सुनिल अनुसे, महेश घबक व सचिन पाटील हे तिघे शाळेच्या ओटयावर झोपले होते. काही वेळाने फरशीवर जोरात आदळल्याचा आवाज झाल्यावर सुनिल व महेश झोपेतून जागे झाले. त्यावेळी विशाल भोसलेने सचिनच्या डोक्यात मोठा दगड मारला होता. त्यानंतर पुन्हा विशालने तोच दगड उचलून सचिनच्या डोक्यात मारला.

सचिनच्या डोक्यातून मोठयाप्रमाणात रक्तस्त्राव होवू लागला. दगडाचा घाव वर्मी बसल्याने डोक्यात गंभीर जखम झाली. सुनिल व महेशने सचिन पाटीलला जखमी अवस्थेत कोल्हापूर येथील प्रभू हॉस्पिटमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना सचिन पाटील याचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here