धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला असून त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांच्या तब्बेतीची चौकशी केली.

धनंजय मुंडे यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने ते रुग्णालयात दाखल झाले असून प्रकृती सध्या स्थिर आहे. डॉक्टरांनी त्यांच्या आवश्यक त्या तपासण्या करून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. सध्या ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. दरम्यान, धनंजय मुंडे यांना हृदयविकाराच्या धक्क्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक आणि धडाडीचे नेते म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील परळी मतदार संघाचे ते प्रतिनिधित्व करत आहेत.धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेते असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख आहे.

Leave a Comment