कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एकत्रितपणे उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब पाटील आणि भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेतली. यावेळी डॉ. अतुल भोसलेंसोबतच्या नेमकी युती कोणत्या उद्देश्याने केली यामागचे कारण आ. पाटलांनी स्पष्ट केले. “आम्हाला ही निवडणूक काय नवीन नाही. आमच्यात काही राजकीय संदर्भ बदलले ते आता आम्ही सुधारले आहेत. राजकारण विरहित आम्ही काम करणार असून त्यामुळे कराड तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या उद्देश्याने आम्ही एकत्रित आलोय, असे पाटील यांनी म्हंटले.
कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कराड उत्तर विधासभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांच्यासोबत युती केली आहे. शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून दोघांकडून निवडणुकीत आपल्या गटातील उमेदवार उतरवले आहेत. यावेळी माजी सहकारमंत्री तथा आमदार बाळासाहेब पाटील, भाजप नेते डॉ. अतुल भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील यांनी आज कराडात पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.
आ. बाळासाहेब पाटील म्हणाले की, कराड तालुका हा भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा आहे. या तालुक्यात कराड दक्षिण आणि कराड उत्तर यासह सुपने, तांबवे हा विभाग पाटण विधानसभा मतदार संघात येतो. त्यामुळे विविधता हि मोठ्या प्रमाणात आहे. अशा अपरिस्थितीत आम्ही डॉ. अतुल भोसले, आनंदराव पाटील, जगदीश जगताप, मदनदादा मोहिते अशी सर्व तालुक्यातील मंडळी या कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीस सामोरे जात आहोत.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/572818938158218
आम्हाला हि निवडणूक काही नवीन नाही. ज्यावेळी बाजार समिती आमच्याकडे होती. त्याकाळी आम्ही शेतकऱ्यांसाठी भरीव अशी कामे केली. त्यानंतर काही राजकीय संदर्भ बदलले. ते आता आम्ही सुधारलेली आहेत.कराडपासून कोकण जवळ आहे, मराठवाडा जवळ हे. पुणे-मुंबई हायवेही जवळ आहे. या ठिकाणचा जो शेतमाल आहे. तो गतीने राज्याच्या तसेच परराज्याचे इतर भागात जावा यासाठी आम्ही त्या काळात काही शेड उभे केले, विकास कामे केली. ती आता अधिक गतिमान करायची आहेत.
राज्यात काही ठिकाणी खासगी मार्केटचा प्रयोग आला. परंतु त्यामध्येत्यातील अपयश हे सर्वांच्या लक्षात आले. त्यामुळे सर्वांचा उद्देश हा शेती उत्पन्न बाजार समितीच्याकडे राहिलेला आहे. या माध्यमातून आम्ही निरनिराळ्या योजना त्या ठिकाणी राबविणार आहोत. आम्ही ज्या ज्या संस्था क्षेत्रात काम करतो त्या राजकारण विरहित म्हणून काम करतो. आणि याही मार्केट कमिटीमध्ये आम्ही राजकारण विरहित पद्धतीने काम करणार असल्याचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.