शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Happy Friendship Day | बाळासाहेब ठाकरे आणि चित्रपट नगरीचा तसा जुना ऋणानुबंध आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेते दादा कोंडके यांची बाळासाहेबांसोबत चांगलीच मैत्री होती. त्याच्यातील याराना संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे. या दोघांची मैत्री कशी झाली, त्यांचे संबंध कसे होते, ह्या याराना ला काय कारणं होती? जाणुन घ्या.

तर त्याचं झालं असं, मुंबईच्या दादर जवळील कोहिनूर थिअटर मधे दादा कोंडकेंचा सोंगाड्या चित्रपट प्रदर्शीत होणार होता. त्यासाठी कोंडके यांनी महिणाभर अगोदर बुकींग केले होते. परंतु कोहिनुर मधे देव आनंदचा चित्रपट “जाॅनी मेरा नाम” लावण्याचे ठरवण्यात आले. दादा कोंडकेंच्या सोंगाड्या चित्रपटला डिच्चू देऊन जाॅनी मेरा नाम ला संधी देण्यात आल्याने कोंडके अस्वस्थ झाले. मराठी चित्रपटांची होत असलेली कुचंबना त्यांना बगवत नव्हती. त्यावेळी मुंबई मधे शिवसेनेचे वजन होते. दादा कोंडके सोंगाड्याच्या चित्रीकरणाचा विषय घेऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भेटायला गेले. बाळासाहेबांना कोंडकेंचा विषय महत्वाचा वाटल्याने त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. दुसर्याच दिवशी कोहिनुर थिएटर बाहेर शिवसेनेच्या शिवसैनिकांची शेकडोंची फौज गोळा झाली. शिवसेनेने मराठी चित्रपटांच्या होत असलेल्या कुचंबनेविरोधात आवाज उठवला. निदर्शने केली. शेवटी कोहिनुर ने दादा कोंडकेंचा चित्रपट लावण्याचे मान्य केले. आणि सोंगाड्या मराठी प्रेक्षकांच्या भेटीला अाला.

सोंगाड्याच्या निमित्ताने झालेली दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची दोस्ती पुढेही कायम राहीली. यानंतर दादा कोंडके शिवसेनेत सक्रिय झाले. शिवसेनेच्या अनेक रेलींमधे कोंडकेंनी सक्रीय सहभाग नोंदवला. दरम्यान आपल्या विधानांनी त्यांनी वादही ओढवून घतले. एका कार्यक्रमात, “शरद पवारांना राजीव गांधींचे बुट पुसण्याशिवाय दुसरे कोणतेच काम नाही” असे कोंडकेंनी विधान केले होते.

मुख्यमंत्री व्हायची इच्छा

दादा कोंडकेंना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती. एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी “मै सी.एम. बनना चाहता हूँ।” असे विधान केले होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एकदिवस आपल्याला नक्की तशी संधी देतील असे त्यांना वाटत होते.

इतर महत्वाचे लेख –

महाराष्ट्राचा आदर करायला मला बाळासाहेबांनीच शिकवलं – जॅकी श्रॉफ

आणि राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा ढाब्यावर थांबला…

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगला देण्यास राज ठाकरेंचा विरोध

 

Leave a Comment