टीम हॅलो महाराष्ट्र । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानाबाबत आदित्य ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ”संजय राउत यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. संजय राऊत किंवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्वतः इंदिरा गांधींबद्दल आदर होता. त्यामुळे कोणत्याही शिवसैनिकाकडून त्यांच्याबद्दल अपशब्द येणार नाही.” अशी प्रतिक्रिया प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरे यांनी वादावर पडदा टाकण्याचं प्रयत्न केला.
ते पुढे म्हणाले की,”राऊत यांनी केलेलं विधान हे वेगळ्या संदर्भता होतं, त्यांचे ते निरिक्षण होतं. त्यामुळे प्रत्येक विधानं हे त्या संदर्भातणं बघणं गरजेचं आहे. या मुद्द्यावर विरोधकांना प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, आता निवडणुका होऊन गेल्या आहेत त्यामुळे राजकीय न बोलता कामाबद्दल बोलावं.
दरम्यान इंदिरा गांधी आणि डॉन करीम लाला यांच्या तत्कालीन भेटी संदर्भात संजय राऊत यांनी एका जाहीर मुलाखतीत वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राजकीय वर्तुळात बराच गदारोळ माजला आहे. एकीकडे काँग्रेसने राऊत यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेत त्यांच्या माफीचे आवाहन केलं होत तर दुसरीकडं भाजपने राऊत यांच्या वक्तव्यवरुन काँग्रेसला अंडरवर्ल्ड फायनान्स तर करत नव्हता ना? अशी विचारणा करत काँग्रेसला लक्ष केलं होत. वाद अंगलट समजताच संजय राऊत यांनी आपले विधान मागे घेत असल्याचे माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे.