हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृष्णकुंज येथे आज भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही पक्षातील युतीबाबतही चर्चा होऊ लागली आहे. याबाबत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी महत्वाचे विधान केले असून त्यांनी राज ठाकरे भविष्यात भाजपसोबत जातील, असे वाटत नसल्याचे थोरात यांनी म्हंटले आहे.
काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरे व चंद्रकांत पाटील यांच्या भेटीबाबत माध्यमांशी संवाद साधताना मत व्यक्त केले. यावेळी थोरात म्हणाले की, मनसेचे राज ठाकरे यांना ‘लाव रे तो व्हिडीओ’ प्रयोग आठवत असतील. त्यांनी ज्या पद्धतीने भाजपावर टीका केली आहे, त्यावरून तरी किमान राज ठाकरे भविष्यात भाजपासोबत जातील, असे सध्या तरी वाटत नाही.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतल्यानंतर त्यांच्या या भेटीबाबत महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून टोलेबाजी केली जात आहे. वास्तविक पाहता लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वाधिक टीका हि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर केली होती.