हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीमध्ये नवा वाद होण्याची शक्यता आहे. नुकतंच झालेल्या अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून दमदार कामगिरी करणाऱ्या भास्कर जाधव यांनी पुन्हा हे पद स्विकारन्याची तयारी दर्शवली पण वनखाते काँग्रेसला देऊन विधानसभा अध्यक्षपद नको अशी भूमिका त्यांनी घेतली. दरम्यान याबाबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना विचारल असता त्यांनी स्पष्टच प्रतिक्रिया दिली.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांनी चांगले काम केले. त्यांचे कौतूकच आहे. पण आमच्याकडेही अनेक ‘भास्कर जाधव’ आहेत त्यामुळे हे पद शिवसेनेला देण्यासंबंधी कोणतीही चर्चा किंवा विचार सुरू नाही. हे पद काँग्रेसकडेच राहणार आहे,‘ अशी भूमिका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मांडली.
आमच्या पक्षातही असे सक्षमपणे काम करू शकणारे नेते आहेत. शिवाय जागा वाटपात हे पद काँग्रेसकडे आलेले आहे. त्यामुळे हे पद आमच्याकडेच राहील अस म्हणत अध्यक्षपद निवडणूक प्रक्रिया मोठी असल्याने आणि कोणाचाही हक्क डावलला जाऊ नये, यासाठी वातावरण निवळल्यावरच ही निवडणूक घ्यावी लागणार आहे.’