Bandhan Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!!! FD वर मिळणार 8% पर्यंत व्याज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  Bandhan Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत चार वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता मुंबईस्थित खाजगी क्षेत्रातील Bandhan Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे.

Bandhan Bank Sees 21 Rise In Loans And Advances At End Mar 21 Deposits Jump By 37 - BW Businessworld

7 नोव्हेंबर 2022 पासून नवीन दर लागू

Bandhan Bank च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, हे नवीन दर 7 नोव्हेंबर 2022 पासून लागू होणार आहेत. या बदला नंतर ग्राहकांना 600 दिवसांच्या कालावधीसाठी डिपॉझिट्सवर 7.5% पर्यंत व्याजदर मिळेल. दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिकांना या FD वर 0.50% किंवा 50 bps जास्त लाभ मिळेल.

बँक ज्येष्ठ नागरिकांना 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD साठी 0.75% किंवा 75 bps जास्त व्याज दर देते. बंधन बँकेचे सध्याचे ग्राहक रिटेल इंटरनेट बँकिंग किंवा mBandhan मोबाइल अ‍ॅपद्वारे एफडी बुकिंग किंवा गुंतवणूकीचा लाभ घेऊ शकतात. या ऑनलाइन प्रक्रियेमुळे ग्राहक कोणत्याही त्रासाशिवाय त्वरित FD बुक करू शकतात.

Bandhan Bank set to raise up to Rs 10,500 cr, cut promoter holding - The Economic Times

Bandhan Bank च्या एफडीचे नवीन दर

आता बँक 2 ते 10 कोटींच्या FD वर 3.00% ते 5.60% पर्यंत व्याजदर देत आहे. जर आपण बंधन बँकेत 7 ते 14 दिवसांची FD केली तर 3.00% व्याजदर मिळेल तर 15 ते 30 दिवसांच्या FD वर 3.00%, 31 दिवस ते 2 महिन्यांच्या FD वर 3.50%, 2 महिने ते 3 महिन्यांच्या FD वर 4.50%, 3 महिने ते 6 महिन्यांच्या FD वर 4.50%, 6 महिने ते 1 वर्षांच्या FD वर 4.50%,1 वर्ष ते 599 दिवसांपर्यंत FD वर 7% व्याज दर मिळेल. त्याच वेळी, 600 दिवसांच्या FD वर सर्वाधिक व्याज 7.50% मिळत आहे.

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

अनेक बँकांनी FD चे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर

अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. Bandhan Bank

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://bandhanbank.com/rates-charges

हे पण वाचा :
EPFO च्या EDLI स्कीमअंतर्गत अशा प्रकारे मिळवा 7 लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्स
Multibagger Stock : ‘या’ केमिकल स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला साडेतीन पट रिटर्न !!!
FD Rates : ‘या’ बँका FD वर देत आहेत जास्त रिटर्न, व्याज दर तपासा
आता फक्त एका कॉलमध्ये घरबसल्या अशा प्रकारे अपडेट करा Aadhaar Card !!!
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 100 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे स्टेट्स तपासा