हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगी क्षेत्रातील Bandhan Bank कडून आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात बदल करण्यात आला आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, 16 सप्टेंबर 2022 पासून घरगुती आणि अनिवासी दोन्ही रूपी बचत बँक खात्यांसाठी हे नवीन व्याजदर लागू होतील. या बदलानंतर बँक आता बचत खातेधारकाला 6.50 टक्क्यांपर्यंत व्याज देणार आहे.
Bandhan Bank च्या अधिकृत वेबसाइटनुसार, जर आपल्या बचत खात्यामध्ये 1 लाख रुपयांपर्यंत बॅलन्स असेल तर आपल्याला 3.00 टक्के दराने व्याज दिले जाईल. त्याच वेळी, 1 ते 10 लाख रुपयांच्या बॅलन्सच्या रकमेवर 6.00 टक्के व्याजदर मिळेल. त्याच वेळी, 10 लाख ते 2 कोटी रुपयांच्या डिपॉझिट्सवर 6.25 टक्के बँकेकडून व्याजदर दिला जाणार आहे.
तसेच आता Bandhan Bank कडून आपल्या बचत खात्यामधील 2 कोटी ते 10 कोटी रुपयांच्या डेली बॅलन्सच्या रकमेवर 6.00 टक्के व्याजदर देण्यात येईल. तसेच बचत खात्यामधील 10 कोटी ते 50 कोटींच्या डेली बॅलन्सच्या रकमेवर 6.00 टक्के आणि 50 कोटी ते 100 कोटींच्या डेली बॅलन्सच्या रकमेवर 6.50 टक्के व्याजदर मिळेल.
इथे हे लक्षात घ्या कि, वरील व्याजदर हे खात्यांमधील दिवसअखेरच्या थकबाकीच्या आधारावर प्रतिदिन ठरवले जातील. याव्यतिरिक्त, Bandhan Bank कडून, प्रत्येक कॅलेंडर तिमाहीचे 30 जून, 30 सप्टेंबर, 31 डिसेंबर आणि 31 मार्च रोजी व्याज दिले जाते.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://bandhanbank.com/rates-charges
हे पण वाचा :
Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, गेल्या आठवड्यात बाजाराची स्थिती कशी होती ते पहा
PNB कडून ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार जास्त व्याजदर, नवीन दर तपासा
चांगला Password तयार करण्यासाठी वापरा ‘या’ खास टिप्स !!!
UPI-नेट बँकिंगद्वारे डिजिटल पेमेंट करताना लक्षात ठेवा ‘या’ 5 गोष्टी
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी Nora Fatehi ची दिल्ली पोलिसांकडून 5 तास चौकशी