व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

उद्धव ठाकरेंचं अस्तित्व फक्त मातोश्रीच्या कक्षेत; राणेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरेंचं अस्तित्व हे मुख्यमंत्री पदावरून उतरताच संपलं, आता त्यांचे अस्तित्व फक्त मातोश्री पुरत आहे असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेनाच मिळेल असेही त्यांनी म्हंटल. मुंबईत प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

मुंबई महापालिकेसाठी सर्व पक्षांची धावपळ सुरू आहे. त्यातच उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वासाठी दसरा मेळावा महत्त्वाचा आहे याबाबत प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरेंचे अस्तित्व कुठे आहे?? ज्या दिवसी ते मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले त्याच दिवशी त्यांचं अस्तित्व संपलं. आता त्यांचे अस्तित्व फक्त मातोश्रीच्या कक्षेत आहे असा टोला राणेंनी लगावला.

तसेच दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याची परवानगी एकनाथ शिंदे यांनाच मिळणार आणि धनुष्यबाण हे चिन्ह देखील शिंदेनाच मिळणार असं नारायण राणे यांनी म्हंटल. दरम्यान, कोकणात नाणार होणारच आणि कोणाचाही विरोध चालू देणार नाही. नाणार प्रकल्प हातून जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मी स्वतः मंत्री आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे, हीच जागा आम्ही कंपनीला द्यायला तयार आहोत,असंही राणे म्हणाले.