हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : रिझर्व्ह बँकेने नुकतेच रेपो दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. यानंतर आता जवळपास सर्वच बँकांनीही आपले व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे बँकांची कर्जे महाग होत असतानाच FD आणि इतर बचतीवरील व्याजदर देखील वाढण्यात आले आहेत. जर सर्व बँकांच्या FD वरील व्याजदरांची तुलना केली तर अनेक खाजगी क्षेत्रातील बँका खूप जास्त नफा देत आहेत.
आता या बँकांमध्ये FD करून आपल्याला चांगले व्याज मिळू शकेल. तसेच याद्वारे टॅक्स देखील वाचवता येईल. खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील जवळपास 10 बँकांमध्ये गुंतवणूकदारांना सर्वाधिक वार्षिक 6.75 टक्के व्याज दिले जात आहे. चला तर मग कोणत्या बँकेमध्ये सर्वाधिक व्याज मिळत आहे ते जाणून घ्या … या FD द्वारे आपल्याला वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करून टॅक्स देखील वाचवता येईल. या एफडींना 5 वर्षांचा लॉक-इन पिरियड देखील असतो. हे लक्षात घ्या कि, या बँकांचे व्याजदर हे 6 एप्रिलच्या आकडेवारीवर आधारित आहेत. Bank FD
खाजगी क्षेत्रातील AU Small Finance Bank आणि Suryoday Small Finance Bank आपल्या ठेवीदारांना FD वर सर्वाधिक व्याज दिले जात आहेत. या बँकेत 5 वर्षांच्या एफडीवर 6.75 टक्के व्याज दिले जात आहे. यामध्ये 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करून पाच वर्षांत 2.10 लाख रुपये मिळतील. Bank FD
खाजगी क्षेत्रातील ड्यूश बँक, डीसीबी बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि येस बँक ग्राहकांना 6.25 टक्के व्याज देत आहेत. जर या चार बँकांमध्ये पाच वर्षांसाठी FD केली तर 1.5 लाखांच्या गुंतवणुकीवर 2.05 लाख रुपये मिळतील. यासोबतच यामध्ये टॅक्स सूट देखील मिळेल. Bank FD
याशिवाय इंडसइंड बँकेकडूनही आपल्या ग्राहकांना पाच वर्षांच्या एफडीवर 6.5 टक्के वार्षिक व्याज दिले जात आहे. या बँकेतही 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करून पाच वर्षांत 2.07 लाख रुपये मिळतील. Bank FD
जर आपल्याला FD वर आणखी व्याज हवे असेल तर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आणि RBL बँक यांची देखील निवड करता येईल. उज्जीवन बँकेकडून ग्राहकांना एफडीवर वार्षिक 6.4 टक्के व्याज दिले जात आहे. यामध्ये 1.5 लाखांची गुंतवणूक करून पाच वर्षांत 2.06 लाख रुपये मिळतील. RBL बँकेकडून 6.3 टक्के व्याज मिळत आहे, जिथे 1.5 लाखांची गुंतवणूक करून पाच वर्षांत 2.05 लाख रुपये मिळतील.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, ही आणखी एक बँक देखील ठेवीदारांना 6 टक्के व्याज देत आहे. या बँकेच्या FD मध्ये 1.5 लाखांची गुंतवणूक करून पाच वर्षांत 2.02 लाख रुपये मिळतील. Bank FD
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.aubank.in/personal-banking/term-deposits/fixed-deposits/interest-rates
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये घसरण, आजचे नवीन दर पहा
rave party काय असते ??? मोठ्या घरातील तरुणांमध्ये त्याची क्रेझ का वाढते आहे ???
Car Safety Features : नवीन कार खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते जाणून घ्या