हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : रिझर्व्ह बँकेकडून मे महिन्यात रेपो दर आणि CRR मध्ये वाढ करण्यात आली. त्यामुळे एकीकडे कर्ज महागले तर दुसरीकडे FD वर जास्त रिटर्न दिला जात आहे. जवळपास देशातील सर्वच बँकांनी FD चे व्याजदर वाढवले आहेत.
शेअर बाजारातील प्रचंड अस्थिरता लक्षात घेता FD मध्ये गुंतवणूक करण्याची हीच सर्वोत्तम वेळ आहे. FD मध्ये गुंतवणूक करणे हे सुरक्षित असते. याबरोबरच त्यावर गॅरेंटी देखील मिळते. व्याजदरात वाढ सुरू झाली आहे. येत्या काळात त्यामध्ये आणखी वाढ होण्याची देखील शक्यता आहे. Bank FD
जर तुम्हांलाही FD मध्ये गुंतवणूक करायची असेल तर ती तुमच्या आई-वडिलांच्या नावावर करणे जास्त फायदेशीर ठरेल. याद्वारे तुम्हांला जास्त व्याज देखील मिळेल. सध्या बहुतेक बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना (60 वर्षे किंवा त्याहून अधिक) अर्धा टक्का (0.5 टक्के) जास्त व्याज दर मिळत आहे. Bank FD
अनेक बँका 2 कोटी रुपयांपर्यंतच्या आणि 3 वर्षांचा कालावधी असलेल्या FD वर 7.1 टक्के व्याज देत आहेत. खासगी बँकांमध्ये DCB बँकेकडून सर्वाधिक व्याज दर दिला जात आहे. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना 3 वर्षांच्या FD वर 7.1 टक्के व्याज देत आहे. त्याचप्रमाणे बंधन बँक, इंडसइंड आणि येस बँक ज्येष्ठ नागरिकांना 3 वर्षांच्या FD वर 7 टक्के व्याज देत आहेत. तसेच RBL बँक 6.8 टक्के आणि IDFC फर्स्ट बँक 6.5 टक्के देते. Axis Bank, Federal Bank, IDBI आणि Kotak Mahindra Bank मध्ये FD केल्यास 3 वर्षांसाठी 6.25 टक्के व्याज मिळेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.paisabazaar.com/fixed-deposit/senior-citizen-fixed-deposit/
हे पण वाचा :
EPFO : आता घरबसल्या अशा प्रकारे चेक करा PF बॅलन्स
Investment : अशा प्रकारे गुंतवणूक करून 15 वर्षांत मिळवा 1.2 कोटी रुपये !!!
Sologamy : मुलाशी नाही तर स्वतःशीच लग्न करणार गुजरातची ‘ही’ मुलगी !!!जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Multibagger Stock : गेल्या सहा महिन्यांत ‘या’ शेअर्समध्ये झाली 645 टक्क्यांची जोरदार वाढ !!!
Bollywood : 2022 मध्ये अवघ्या 5 महिन्यात संगीत क्षेत्राने गमावले ‘हे’ 7 दिग्गज