हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : अर्थसंकल्पानंतर ज्येष्ठ नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहेत. सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्येपोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) अंतर्गत गुंतवणूकीची मर्यादा वाढवल्यानंतर, बँकांकडून आता मोठ्या ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा दुहेरी फायदा झाला आहे.
अर्थमंत्र्यांनी दिला मोठा दिलासा
यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) मधील गुंतवणुकीची मर्यादा 15 लाख रुपयांवरून 30 लाख रुपये केली आहे. 2004 मध्ये सुरू झालेली ही योजना सरकारद्वारे देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवली जाणारी बचत योजना आहे. Bank FD
निवृत्त लोकांना आर्थिक सहाय्य देणे हा या योजनेचा उद्देश आहे. तसेच या योजनेअंतर्गत देशभरातील अनेक बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येते. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी केंद्र सरकारकडून ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील (SCSS) व्याजदरात 8 टक्के वाढ करण्यात आली आहे.
तसेच आता जना स्मॉल फायनान्स बँक आणि बंधन बँक या बँकांकडूनही फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केल्याची घोषणा करण्यात आली आहे. आता या बँका ज्येष्ठ नागरिक आणि इतरांना एफडीवर आकर्षक व्याजदर देत आहेत. Bank FD
‘या’ बँकांच्या FD वर मिळणार 8.80% पर्यंत व्याज
सोमवारी बंधन बँकेकडून फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात 50 बेसिस पॉंईटसने वाढ करण्यात आली आहे. बँकेने याबाबत माहिती देताना सांगितले की, 6 फेब्रुवारी 2023 पासून हे नवीन दर लागू झाले आहेत. तसेच हे नवीन सुधारित दर 2 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर लागू होतील. मात्र, हे नवीन दर मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध असतील. यानंतर बंधन बँकेकडूनज्येष्ठ नागरिकांना 600 दिवसांच्या कालावधीच्या FD साठी 8.5% तर सर्वसामान्य नागरिकांना 8% व्याजदर दिले जाईल. Bank FD
हे जाणून घ्या कि, 1 फेब्रुवारी 2023 पासून जना स्मॉल फायनान्स बँकेने देखील आपल्या नियमित फिक्स्ड डिपॉझिट्सवरील आणि 6 फेब्रुवारी 2023 पासून FD प्लस योजनेवरील व्याजदरात वाढ केली आहे. त्याचवेळी,1 फेब्रुवारी 2022 पासून जना बँक ज्येष्ठ नागरिकांना रिकरिंग अकाउंटवर 8.8% पर्यंत व्याज देत आहे.
जना बँक आता 2 वर्ष ते 3 वर्षांच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 8.8% पर्यंत तर सर्वसामान्य नागरिकांना 8.10% व्याज दर देत आहे. त्याच वेळी, ग्राहकांना 2-3 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी FD Plus वर 8.25% व्याजाचा लाभ मिळू शकेल.Bank FD
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.nsiindia.gov.in/InternalPage.aspx?Id_Pk=62
हे पण वाचा :
Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स
Adani Group ला आणखी एक झटका !!! सिटी बँकेनंतर आता ‘या’ बँकेने देखील कर्ज देण्यास नकार
Pre-Approved Loan म्हणजे काय ??? जाणून घ्या ते घेण्याचे फायदे
Earn Money : मोबाईलवरून फोटो काढून कमवता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची पद्धत
Activa Electric Scooter : आपल्या पेट्रोल अॅक्टिव्हाला अशा प्रकारे बदला इलेक्ट्रिकमध्ये, त्यासाठी किती खर्च येईल ते पहा