हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Holidays : जर आपले सप्टेंबरमध्ये बँकेमध्ये जाणार असाल तर आधी बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट पाहणे महत्वाचे ठरेल. सध्याच्या डिजिटल काळात बँकेची अनेक कामे घरबसल्या करता येतात. मात्र अशाही अनेक गोष्टी आहेत ज्यासाठी आपल्याला बँकेमध्ये जावे लागेल. अनेक लोकांना बँकेच्या सुट्ट्यांबाबतची माहिती नाहीत. त्यामुळे बँकांच्या सुट्ट्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
येत्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी बँका जवळपास 13 दिवस बंद राहतील. हे लक्षात घ्या कि, आता ऑगस्टमध्येही उरलेले दिवसांपैकी काही बँका बंद राहणार आहेत. उदाहरणार्थ, 27 ऑगस्ट रोजी चौथा शनिवार आणि 28 ऑगस्ट रोजी रविवार असल्याने बँक बंद राहतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 29 ऑगस्टला श्रीमंत शंकरदेव तिथी आहे. या दिवशी गुवाहाटीमध्ये बँका बंद राहतील तर गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 ऑगस्ट रोजी बँका बंद राहतील. Bank Holidays
हे जाणून घ्या या सर्व सुट्ट्या देशभरात एकाच वेळी लागू होणार नाहीत. प्रत्येक राज्यांनुसार वेगवेगळ्या सुट्ट्या आहेत. ऑगस्ट महिन्यात शनिवार आणि रविवार असे 18 दिवस सुट्ट्या असणार आहेत. तर, सप्टेंबरमध्ये बँकांना 13 दिवस सुट्ट्या असतील. Bank Holidays
सुट्ट्यांची लिस्ट पहा
1 सप्टेंबर 2022 – गणेश चतुर्थीनिमित्त बँकेला सुट्टी असेल.
4 सप्टेंबर 2022 – रविवारी साप्ताहिक सुट्टी.
6 सप्टेंबर 2022 – झारखंडमध्ये विश्वकर्मा पूजेनिमित्त बँका बंद राहतील.
7-8 सप्टेंबर 2022- तिरुवनंतपुरम, कोची येथे ओणमनिमित्त बँका बंद.
9 सप्टेंबर 2022- गंगटोकमध्ये इंद्रजातावर बँका उघडणार नाहीत.
10 सप्टेंबर 2022 – श्री नरवणे गुरु जयंतीनिमित्त तिरुअनंतपुरम, कोची येथे बँक सुट्टी असेल.
11 सप्टेंबर 2022 – रविवार साप्ताहिक सुट्टी असेल.
18 सप्टेंबर 2022 – रविवारमुळे बँका बंद राहतील.
21 सप्टेंबर 2022 – श्री नारायण गुरु समाधी दिनानिमित्त तिरुवनंतपुरम, कोची येथे बँका बंद राहतील.
24 सप्टेंबर 2022 – चौथ्या शनिवारमुळे बँकांना सुट्टी असेल.
25 सप्टेंबर 2022 – रविवारी साप्ताहिक सुट्टी.
26 सप्टेंबर 2022- जयपूर आणि इम्फाळमध्ये नवरात्रीच्या घटस्थापनेनिमित्त बँकेला सुट्टी असेल. Bank Holidays
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx
हे पण वाचा :
Gold Price Today : सोने-चांदी पुन्हा महागले, आजचा भाव पहा
‘या’ कारणांमुळे Google कडून मिळतात Adult Ads चे नोटिफिकेशन्स !!!
E-Shram : ‘या’ सरकारी योजनेमध्ये कामगारांना दिला जातो 2 लाख रुपयांचा मोफत विमा !!!
Tokenization of cards : 1 ऑक्टोबरपासून बदलणार कार्ड पेमेंटशी संबंधित ‘हे’ नियम !!!
फिजिकल गोल्डप्रमाणे Sovereign Gold Bonds वर देखील कर्ज मिळेल का ???