E-Shram : ‘या’ सरकारी योजनेमध्ये कामगारांना दिला जातो 2 लाख रुपयांचा मोफत विमा !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । E-Shram : देशातील असंघटित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामगार आणि मजूर काम करतात. अशा लोकांसाठी शासनाकडून विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. यामध्ये आता केंद्र सरकारकडून मजुरांना आर्थिक मदत देण्यासाठी ई-श्रम योजना लाँच करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना E-Shram कार्ड द्वारे विविध सरकारी योजनांचा लाभ घेता येईल.

e-Shram Card Download: If eSHRAM card is not able to be made, then follow this trick, it will be downloaded immediately - Business League

2 लाख रुपयांपर्यंतचा मोफत विमा

E-Shram योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन करून असंघटित क्षेत्रातील कामगारांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा मोफत दिला जातो. याशिवाय ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणाऱ्यांना भविष्यात देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ सहजपणे मिळू शकेल.

ई-श्रम Portal] E Shram Card Registration 2022 Online Apply – eshram.gov.in Register, CSC Login, Benefits

अशा प्रकारे करा रजिस्ट्रेशन

E-Shram पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी, सर्वांत आधी ई-श्रम पोर्टल http://eshram.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. येथे ई-श्रम रजिस्ट्रेशनच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाकावा लागेल.

यानंतर कॅप्चा कोड टाकून सेंड ओटीपीवर क्लिक करावे लागेल. दिलेली सूचना वाचून विचारलेले तपशील भरावे लागतील. यानंतर सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.

CSC eShram Card Distribution through csc vle - CSC VLE NEWS

कोणाकोणाला रजिस्ट्रेशन करता येईल ???

18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेला कोणताही असंघटित क्षेत्रातील कामगाराला E-Shram पोर्टलवर स्वतःचे रजिस्ट्रेशन करता येईल. याद्वारे कामगारांना अनेक फायदे मिळतील.

हे पण वाचा :

Tokenization of cards : 1 ऑक्टोबरपासून बदलणार कार्ड पेमेंटशी संबंधित ‘हे’ नियम !!!

ग्राहकांचा डेटा विकून IRCTC कमावणार कोट्यवधी रुपये, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

भक्तांच्या सोयीसाठी रेल्वे सुरु करणार Ganpati Special Trains, लिस्ट तपासा

Multibagger Stock : गेल्या 6 महिन्यांत ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा नफा !!!

Investment Tips : वयाच्या 21 व्या वर्षापासून अशाप्रकारे गुंतवणूक सुरू करून मिळवा लाखो रुपये !!!