Bank Loan : SBI खातेदारांना FD वर घेता येऊ शकेल कर्ज, त्यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या

Salary Slip
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Loan : आणीबाणीच्या प्रसंगी प्रत्येकालाच पैशांची गरज भासते. अशा परिस्थितीत अनेकदा बँकांकडून कर्ज घेतले जाते. मात्र त्यासाठीची प्रक्रिया खूप किचकट असते आणि त्यासाठी वेळही जास्त लागतो. तर आज आपण एक अशी माहिती जाणून घेणार आहोत ज्याद्वारे सहजपणे कर्ज मिळू शकेल. हे लक्षात घ्या कि, जर आपले SBI मध्ये खाते असेल आणि बँकेत तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट केले असेल तर आपल्याला बँकेकडून सहजपणे कर्ज दिले जाईल.

SBI Loan against FD: Want quick loan against deposits? Here is what you can do | Zee Business

तसेच SBI कडून फिक्स्ड डिपॉझिटवर कर्ज मिळवण्याची पात्रता देखील खूप मर्यादित आहे. हे कर्ज कोणत्याही भारतीय नागरिकाला घेता येऊ शकेल. याव्यतिरिक्त कोणतीही पार्टनरशिप फर्म, सेल्फ प्रोपराइटरशिप, असोसिएशन आणि ट्रस्टना देखील FD वर कर्ज घेता येऊ शकेल. Bank Loan

या कर्जाविषयी जाणून घ्या

या कर्जासाठीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी आपला CIBIL स्कोअर पहिला जात नाही. तसेच SBI कडून आपल्याला FD च्या एकूण मूल्याच्या 95 टक्के पर्यंत कर्ज मिळू शकेल. तसेच या कर्जासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क देखील भरावे लागणार नाही. यामध्ये डिमांड लोन आणि ओव्हरड्राफ्टची सुविधा देखील दिली जाते. यामध्ये ऑनलाइन ओव्हरड्राफ्टद्वारे आपल्याला कमीत कमी 5,000 रुपये तर जास्तीत जास्त 5 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकेल. Bank Loan

Types of fixed deposit: How to Choose the Right FD | IDFC FIRST Bank

फिक्स्ड डिपॉझिट्सवर अशा प्रकारे मिळवा कर्ज

SBI कडून फिक्स्ड डिपॉझिट्सवर कर्ज घेण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे पेपरवर्क करण्याची गरज नाही. तसेच यासाठी इंटरनेट बँकिंग, SBI चे मोबाइल बँकिंग App YONO द्वारे देखील अर्ज करता येईल. याशिवाय बँकेच्या शाखेशी देखील संपर्क साधू येऊ शकेल. Bank Loan

नेट बँकिंगद्वारे अशा प्रकारे करा अर्ज

यासाठी सर्वांत आधी SBI च्या नेट बँकिंग मध्ये लॉगिन करावे लागेल. त्यानंतर मेनू सेक्शन मधून e-FD चा पर्याय निवडाव लागेल. त्यानंतर ‘Overdraft against FD’ यावर क्लिक करा. आपण केलेल्या सर्व FD ची लिस्ट समोर दिसेल. त्यापैकी कोणतीही एक ऍक्टिव्ह एफडी निवडा आणि ओव्हरड्राफ्टसाठी अर्ज करण्याची रिक्वेस्ट करा. आता प्रोसीड वर क्लिक करा आणि ओव्हरड्राफ्ट रक्कम, लागू ओव्हरड्राफ्ट व्याज दर आणि एक्सपायरी डेट व्हेरिफाय करा. यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर पासवर्ड टाकण्यास सांगितले जाईल. यानंतर कर्जासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. Bank Loan

Follow these steps to repay your personal loan quickly

कर्जाची रक्कम कधी आणि कशी मिळेल ???

फिक्स्ड डिपॉझिट्सवरील कर्जासाठी अर्ज केल्यानंतरच्या काही दिवसांत कर्जाची रक्कम आपल्या बँक खात्यात जमा केली जाईल. तसेच ही रक्कम FD लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केली जाईल. Bank Loan

व्याज दर किती असेल ???

हे लक्षात घ्या कि बँकेकडून हे कर्ज अतिशय कमी व्याजदरावर दिले जाते. यानंतर जसजसे कर्जाची परतफेड केली जाईल तसतसा त्यावरील व्याजदर देखील कमी होईल. हे लक्षात घ्या कि, त्याचा व्याजदर FD दरापेक्षा एक टक्का जास्त असेल. जर आपल्याला FD वर 5 टक्के व्याज मिळत असेल तर कर्जावर 6 टक्के व्याज द्यावे लागेल. Bank Loan

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/yono/loan-against-fixed-deposit

हे पण वाचा :

Bajaj Finance च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर पहा

HSBC Bank कडून FD वरील व्याजदरात बदल, नवीन दर तपासा

Stock Market : Sensex मधील टॉप 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली घट !!!

Infosys : आयटी क्षेत्रातील ‘या’ कंपनीने गेल्या काही वर्षांत मिळवून दिले कोट्यवधी रुपये !!!

Post Office च्या ‘या’ विमा पॉलिसीमध्ये 299 रुपयांमध्ये मिळेल 10 लाखांचे विमा संरक्षण !!