जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची हॉटेल मध्ये आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लिंगनूर शाखेत पासिंग ऑफिसर असणाऱ्या विष्णू आण्णाप्पा गावडे यांनी सांगलीतील कॉलेज कॉर्नरवर असणाऱ्या हॉटेल अक्षरम च्या रूम नं-१०५ मध्ये विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे. विष्णू गावडे हे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लिंगनूर शाखेत पासिंग ऑफिसर म्हणून कार्यरत होते.

आज सकाळी ९ वाजताते घरातून सलगरे शाखेत जातो म्हणून बाहेर पडले होते. त्यानंतर ते सांगलीत आले. त्यांनी कॉलेजकॉर्नरवरील हॉटेल अक्षरम मध्ये येऊन खोली बुक केली. त्यांनी खोलीत जाऊन जेवण मागवले. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वेटर प्लेट आणण्यास गेला. त्याने दरवाजा ठोठावला. आतून काहीही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे त्याने खिडकीतून आत वाकून पहिले असता गावडे हे बेडवर पडलेले दिसले. त्यांनी याची माहिती हॉटेल व्यवस्थापनाला दिली. त्यांनी याची माहिती पोलिसाना दिली. पोलिसानी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. हॉटेल व्यवस्थापनाने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. गावडे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, १ मुलगा, २ मुली असा परिवार आहे. सदरची माहिती समजताच त्यांच्या सहकाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली होती.

इत्तर महत्वाच्या बातम्या –

मोदींचे कट्टर विरोधक अल्पेश ठाकूर यांचा भाजप प्रवेश

युतीने तिकीट नाकारल्यास शिवसेनेचा हा जिल्हाध्यक्ष लढवणार अपक्ष निवडणूक

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र वंचित आघाडीत जाणार

आपसातले मतभेद विसरा संकट मोठं आहे एक होऊन लढा : बाळासाहेब थोरात

राष्ट्रवादीची मान्यता जाणार ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

Leave a Comment