हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Strike : या महिन्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचाऱ्यांकडून पुन्हा एकदा संप पुकारला जाऊ शकतो. 27 जून रोजी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. 9 बँकांची युनियन असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) संघटनेने सांगितले की, जर सरकारकडूनने त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर बँक कर्मचारी एक दिवस काम पूर्णपणे बंद ठेवतील. यामुळे जर कर्मचारी संपावर गेले तर सलग 3 दिवस बँका बंद राहतील, कारण 25 तारखेला महिन्याचा चौथा शनिवार आणि 26 तारखेला रविवार आहे आणि या दिवशी बँकांना सुट्टी असेल.
UFBU कडून अनेक दिवसांपासून बँकांमध्ये 5 दिवसांचा आठवडा लागू करण्याची मागणी केली जात आहे. बँकांनी आठवड्यातून पाचच दिवस काम करावे, असे त्यांचे म्हणणे आहे. खाजगी क्षेत्रातील बहुतेक मोठ्या कंपन्यांना हा नियम लागू आहे. UFBU ने आता म्हटले आहे की, जर सरकारने त्यांच्या 5 दिवस काम आणि पेन्शनच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी 27 जून रोजी संपावर जातील. Bank Strike
एका रिपोर्टनुसार, UFBU ही देशातील 9 बँक युनियनची संयुक्त संस्था आहे. याशिवाय ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन (AIBOC), ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स यांनीही संपात सहभागी होणार असल्याचे संकेत दिले आहेत. Bank Strike
संपाचा प्रभाव जास्त प्रभावी करण्यासाठी बँक संघटनांनी 27 जूनची निवड केली आहे. यामागील कारण असे कि, 27 जून रोजी सोमवार आहे. 25 जून रोजी आठवड्याचा चौथा शनिवार असल्यानेआणि 26 जून रोजी रविवार असल्याने बँकांमध्ये कोणतेही कामकाज होणार नाही. अशा प्रकारे संपामुळे बँका सलग तीन दिवस बंद राहतील. त्यामुळे जर कर्मचारी संघटनांकडून संपाचा निर्णय मागे न घेतला गेला नाही तर ग्राहकांना मोठा त्रास होऊ शकेल. Bank Strike
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्यामध्ये तेजी तर चांदीही वधारली, आजचे दर जाणून घ्या
आता ICICI Bank च्या फिक्स डिपॉझिटवर मिळणार जास्त व्याज, नवीन दर जाणून घ्या
Credit Card युझर्सना आता UPI द्वारेही पेमेंट करता येणार !!!
आपले हरवलेले SBI Card घरबसल्या कसे ब्लॉक करावे हे जाणून घ्या
‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना 1 वर्षात दिले दुप्पट पैसे !!!