288 आमदारांना मी फोन करणार आणि…; उमेदवारी अर्ज भरताच सदाभाऊंची पहिली प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीवरून राज्यात एकीकडे राजकीय वातावरण तापले आहे तर दुसरीकडे विधानपरिषद निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांकडून केली जात आहे. अशात भाजपकडून सहा उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. अपक्ष म्हणून सदाभाऊ खोत यांना सहावा उमेदवार म्हणून भाजपने जाहीर केला. उमेदवारी अर्ज भरताच सदाभाऊंनी पहिली प्रतिक्रिया दिली. “288 आमदार शेतकऱ्यांचे नेतृत्व म्हणून मला विधानपरिषदेवर पाठवण्यात येत आहे. सध्या महाराष्ट्रात 288 आमदार आहेत, मी शक्य तेवढ्या आमदारांना फोन करणार आहे आणि त्यांना मतदान करण्याचेही आवाहन करणार आहे, अशी प्रतिक्रिया सदाभाऊंनी दिली.

अर्ज दाखल केल्यानंतर सदाभाऊंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी खोत म्हणाले की, आज मी माझ्या उमेदवारीचा अर्ज भरलाय. ज्यांच्या मनात माझ्याबद्दल व शेतकऱ्यांबद्दल आदर आहे ते मला नक्की निवडून देतील. सध्या महाराष्ट्रात 288 आमदार आहेत. त्यांच्याशी मी शक्य तेवढ्या होईल तितका संपर्क करणार आहे. तसेच आमदारांना फोन देखील करणार आहे. काही आमदाराची मी प्रत्यक्ष भेट घेणार आहे. मला खात्री आहे की ते मला निवडणुकीत नक्कीच निवडून देतील.

20 जूनला विधानपरिषदेसाठी मतदान होणार असून या पार्श्वभूमीवर भाजपने विधान परिषदेसाठी आपले पाच उमेदवार घोषित केले आहेत. आणि सदाभाऊ खोत यांना पाठिंबा देण्याचेही आज भाजपने जाहीर केले आहे. भाजपाच्या पाठिंब्यानंतर खोत यांनी भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.

Leave a Comment