हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Banking fraud : आजकाल जवळपास देशातील प्रत्येक व्यक्तीकडे बँकेचे खाते आहे. अशातच इंटरनेट बँकिंगचा वापरही सातत्याने वाढतोच आहे. मात्र हे लक्षात घ्या कि, नेट बँकिंगचा कल जसजसा वाढतो आहे, तसतश्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाही वाढतच आहेत. अशा परिस्थितीत आपल्या बँक खात्याशी लिंक केलेला मोबाईल नंबर बंद झाला तर… आपला मोबाईल नंबर आपल्याला ऑनलाइन फसवणुकीपासून वाचवण्यात महत्त्वाचा ठरतो. यामुळेच आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक करणे गरजेचे आहे.
फसवणुकीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी बँकांनी आता आपल्या सिक्योरिटी फीचरमध्ये OTP चा देखील समावेश केला आहे. आजकाल बँकांनी सर्व प्रकारच्या ट्रान्सझॅक्शनसाठी मोबाईल OTP बंधनकारक केला आहे. म्हणूनच आपला योग्य मोबाईल नंबर आपल्या बँक खात्याशी लिंक करणे महत्वाचे आहे.
जर आपल्या बँक खात्यामध्ये रजिस्टर्ड असलेला मोबाईल नंबर बंद झाला असेल तर लगेचच आपला नवीन मोबाईल नंबर अपडेट केला पाहिजे. कारण 3 महिन्यांपासून बंद असलेला नंबर मोबाईल कंपन्या दुसऱ्या व्यक्तीला देतात. यामुळे तुमच्या बँक खात्याशी संबंधित माहिती इतर व्यक्तीपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे बँकेमध्ये रजिस्टर्ड मोबाईल नंबर अपडेट ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. Banking fraud
आता जवळपास सर्वच बँका ऑनलाइन मोबाईल नंबर अपडेट करण्याची सुविधा देतात. आता घरबसल्या बँक खात्याशी लिंक केलेला मोबाईल नंबर बदलता येईल. मात्र त्यासाठी बँक खात्यामध्ये नेट बँकिंगची सुविधा असायला हवी. याशिवाय आपल्याला एटीएममध्ये जाऊन किंवा बँकेच्या शाखेतही जाऊन नंबर बदलता येईल. बँकेच्या शाखेत जाऊनही आपल्याला मोबाईल क्रमांक बदलता येईल. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. या फॉर्मसोबत आपल्याला बँक पासबुक आणि आधार कार्डची फोटोकॉपी देखील जोडावी लागेल.
Banking fraud
SBI च्या ग्राहकांना अशा प्रकारे नंबर बदलता येईल Banking fraud
त्यासाठी बँकेच्या नेट बँकिंग वेबसाइट http://www.onlinesbi.com वर जाऊन लॉगिनवर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर Personal Details वर क्लिक करा.
आता SBI प्रोफाइल पासवर्ड टाका.
सबमिट केल्यावर, तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि जुना नंबर दिसेल.
मोबाईल नंबर बदलण्याचाही पर्याय असेल.
येथे दिलेल्या सूचनांचे पालन करून मोबाईल नंबर बदलता येईल.
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ, नवीन दर तपासा
FD Rates : 94 वर्ष जुन्या असलेल्या ‘या’ बँकेकडून FD च्या व्याजदरात वाढ !!!
खुशखबर !!! आता Post Office मध्ये सुरु होणार ‘या’ सुविधा
EPF किंवा EPS मध्ये ऑनलाइन नॉमिनेशन कसे करावे ??? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
EPF किंवा EPS मध्ये ऑनलाइन नॉमिनेशन कसे करावे ??? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या