हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Banking Service : सोमवारपासून ऑगस्ट महिना सुरू होतो आहे. येत्या महिन्यात बँक-एटीएम आणि बँकिंगशी संबंधित अनेक नियमात बदल होणार आहेत. या बदलाचा थेट परिणाम आपल्या खिशावर होणार आहे.
बँक ऑफ बडोदा 1 ऑगस्टपासून हा नियम बदलणार
बँक ऑफ बडोदा कडून चेक पेमेंटच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. बँकेने आपल्या ग्राहकांना सांगितले आहे की,”1 ऑगस्टपासून 5 लाख किंवा त्याहून जास्त रकमेच्या चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम बंधनकारक असेल. त्याशिवाय आता चेक पेमेंट केले जाणार नाही.” Banking Service
पॉझिटिव्ह पे सिस्टीम म्हणजे काय ???
चेक पेमेंटद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी 2020 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून चेक पेमेंटसाठी ‘पॉझिटिव्ह पे सिस्टीम’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याअंतर्गत, आता चेकद्वारे 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरण्यासाठी काही महत्त्वाची माहिती आवश्यक द्यावी लागेल. या सिस्टीमद्वारे चेकची माहिती मेसेज, मोबाईल एप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएमद्वारे दिली जाऊ शकते. चेकचे पेमेंट करण्यापूर्वी सर्व तपशील पुन्हा तपासले जातील. Banking Service
ऑगस्टमध्ये बँका 13 दिवस राहणार बंद
ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि गणेश चतुर्थी सारखे मोठे सण आहेत. या कारणास्तव या महिन्यात बँका एकूण 13 दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे ऑगस्टमध्ये आपल्याला बँकेशी संबंधित काही कामे करायची असतील तर एकदा सुट्ट्यांची लिस्ट चेक करा. Banking Service
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx
हे पण वाचा :
EPFO : ईपीएफ-पीपीएफमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या
ATM द्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी SBI ने ग्राहकांना दिला ‘हा’ सल्ला !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आजचे नवीन दर पहा
Sukanya Smiriddhi Yojana द्वारे टॅक्स वाचवण्याबरोबरच मुलीच्या भविष्यासाठी जमा करा मोठा फंड !!!
Mutual Funds : ‘या’ तीन फंडांनी 7 वर्षांत गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये !!!