अजित पवार ‘गद्दार’, दिल्लीत बॅनरबाजी; राष्ट्रवादीत शिवसेना पार्ट- 2

Ajit Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवारांच्या बंडखोरीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा उल्लेख गद्दार असा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिल्लीत याबाबत बॅनरबाजी करण्यात आली आहे. आज दिल्लीत शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यापूर्वीच अजित पवार यांना गद्दार म्हणत पोस्टर झळकवण्यात आल्याने आता राष्ट्रवादीत सुद्धा शिवसेना पार्ट 2 सुरु झालाय म्हंटल तरी वावगं ठरणार नाही.

नवी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर सारा देश देख रहा है, अपनों में छुपी गद्दारो को माफ नही करेगी जनता. ऐसी फरजी मक्कारोंको, असा मजकूर पाहायला मिळत आहे. तसेच यावर पाठीत वार केल्याचे छायाचित्र दिसत आहे. या बॅनरच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रथमच अजित पवारांवर थेट वार करण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या गटाकडून नेमकं कशा प्रकारे प्रत्युत्तर देण्यात येणार हे आता पाहावं लागेल. याशिवाय, शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेरही काही पोस्टर्स लावण्यात आली आहेत. त्यावर, सच और झूट की लढाई मे पुरा देश शरद पवार के साथ है, भारत देश का इतिहास है की इसने कभी धोका देने वालो को माफ नही किया, असा मजकूर या लिहिण्यात आलेला आहे.

आज दुपारी 3 वाजता दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची राष्ट्रीय कार्यकारणी पार पडणार आहे. बैठकीला शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, पीसी चाको, योगानंद शास्त्री, जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत. अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हावर दावा ठोकल्याने शरद पवार यावर कस प्रत्युत्तर देणार? कोणती खेळी करणार? याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे.